Government approved ration shops 1323 ISO certified satara sakal
सातारा

कऱ्हाड : १ हजार ३२३ रेशन दुकाने आयएसओ प्रमाणित!

ग्राहकांना दर्जेदार सेवेसाठी पुरवठा विभागाचे पाऊल

हेमंत पवार

कऱ्हाड : सरकारमान्य रेशिंग दुकानाकडे बघण्याचा ग्रामीण भागातील लोकांचा दृष्‍टिकोन चांगला नाही. तो तसा होण्यास त्यातील यंत्रणाही कारणीभूत आहे. हा दृष्‍टिकोन बदलून सर्वसामान्य ग्राहकांना रेशनिंग दुकान आपलेसे वाटावे, यासाठी सर्व रेशनिंग दुकाने, गोदामे, पुरवठा कार्यालये आयएसओ प्रमाणित करण्यात येत आहेत. त्याअंतर्गत जिल्ह्यातील एक हजार ३२३ दुकाने आयएसओ प्रमाणित झाली आहेत. या दुकानांतून ग्राहकांना आता दर्जेदार सेवा मिळण्यास मदत होईल.

सर्वसामान्य लोकांपर्यंत शासकीय योजनांतून स्वस्त मिळणारे अन्नधान्य पोचवण्याचे काम जिल्ह्यातील सरकारमान्य स्वस्त धान्य दुकानांतून केले जाते. त्याव्दारे हजारो गरजूंना धान्याचा पुरवठा केल्याने त्यांचा उदरनिर्वाहाचाही प्रश्न सुटतो. मात्र, हे रेशनिंगचे धान्य ग्राहकांपर्यंत पोचताना अनेकदा गैरप्रकार झाल्याचे यापूर्वीच्या घटनांतून स्पष्ट झाले आहे. त्याचबरोबर अनेक धान्य दुकानांत अस्वच्छतेबरोबर उंदरांचेही साम्राज्य असते. त्यामुळे स्वस्त धान्य दुकानांकडे बघण्याची सर्वसामान्यांची मानसिकता बदलली आहे. स्वस्त धान्य दुकानात काळाबाजार होतो, असाही लोकांचा समज आहे. त्याला त्यात काम करणारी यंत्रणाही जबाबदार आहे. हा समज बदलून लोकांना धान्य दुकान आपलेसे वाटावे, यासाठी आता पुरवठा उपायुक्त डॉ. त्रिगुण कुलकर्णी यांनी संबंधित दुकाने आयएसओ करण्याची संकल्पना मांडली.

त्याला सर्व दुकानदार, जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांनीही ग्रीन सिग्नल दिला. त्यानुसार आता ती कार्यवाही सुरू आहे. दुकानांची रंगरंगोटी करणे, धान्य विक्रीचा दरफलक लावणे, दुकानात अग्निशामक यंत्रणा कार्यान्वित ठेवणे, प्रथमोपचार पेटी, सीसीटीव्ही कॅमेरे, नाईट व्हिजन कॅमेरे, अन्नभेसळ विभागाचा परवाना असणे, ज्‍येष्ठ नागरिक, महिलांना बसण्याची व्यवस्था, पिण्यासाठी स्वच्छ पाण्याची सोय करणे यांसह धान्य दुकानांचा ‘लुक’ चांगला ठेवणे आदी बाबींचा त्यात समावेश आहे. त्यानुसार जिल्ह्यातील एक हजार ६७८ रेशनिंग दुकानांपैकी एक हजार ३२३ दुकाने आयएसओ प्रमाणित झाली आहेत. त्यामुळे ग्राहकांना आता दर्जेदार सेवा मिळण्यास मदत होणार आहे.

जिल्ह्यातील पहिला मान कऱ्हाडला

सातारा जिल्ह्यातील सर्व रेशनिंग दुकाने पुरवठा उपायुक्त डॉ. कुलकर्णी यांच्या संकल्पनेतून जिल्हा पुरवठा अधिकारी स्नेहा किसवे यांच्या मार्गदर्शनाखाली आयएसओ करण्यात येत आहेत. रेशनिंग दुकानदार संघटनेचे जिल्हाध्यक्ष अशोकराव पाटील यांनी जिल्ह्यात पहिल्यांदा त्यांचे कऱ्हाडमधील दुकान आयएसओ प्रमाणित केले. अन्न व नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते त्यांना प्रमाणपत्राचे वितरण करण्यात आले.

सातारा जिल्ह्यातील सरकारमान्य स्वस्त धान्य दुकाने, पुरवठा कार्यालये आणि धान्य साठवणुकीची गोदामे आयएसओ मानांकित करत आहोत. २० गोदामे, ११ कार्यालयांसह १,३२३ दुकाने आयएसओ प्रमाणित झाली आहेत. येत्या महिनाभरात जिल्ह्यातील सर्व दुकाने आयएसओ मानांकित होऊन ग्राहकांना चांगली सेवा मिळेल.

- स्नेहा किसवे-देवकाते,जिल्हा पुरवठा अधिकारी, सातारा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LPG Cylinder Booking Rules : एलपीजी बुकिंगच्या नियमात मोठा बदल, आता ३५ दिवसांनंतरच बुक करता येईल सिलिंडर

आजचे राशिभविष्य - 25 मार्च 2026

Gas Cylinder Shortage Impacts Small Businesses : धक्कादायक! गॅस सिलिंडरच्या टंचाईमुळे त्रस्त झालेल्या हॉटेल व्यावसायिकानं हॉटेलमध्येच घेतला गळफास

Ajit Pawar Plane Crash : अजित पवार अपघातप्रकरणी नवी अपडेट समोर, सहवैमानिकाचे ‘ओह शीट’ उद्‍गार; कटकारस्थान केल्याचा गंभीर आरोप

Chhatrapati Sambhajinagar:‘आदर्श’मध्ये अजूनही ३३८ कोटी अडकलेले ; साडेतीन वर्षांत दहा टक्केही कर्ज वसुली नाही

SCROLL FOR NEXT