money sakal
सातारा

Satara News : दीड हजारात महिना काढायचा कसा? जिल्‍ह्यातील ६३ हजार निराधारांचा राज्‍य सरकारला सवाल

शिंदे-फडणवीस सरकारने या योजनांच्या अनुदान रकमेत वाढ करण्याची घोषणा केली.

प्रशांत घाडगे -@ghadgepd

सातारा : आमदार, खासदारांची पगारवाढ, वेतन आयोग व इतर ठिकाणी भरमसाट पैसे खर्च होताना दिसतात. मात्र, निराधारांच्या योजनांमध्ये सरकारने केवळ पाचशे रुपयांची वाढ केली आहे. पूर्वी महिन्याला एक हजार अनुदान मिळत होते, त्यात आता पाचशेची वाढ केल्याने वाढत्या महागाईचा विचार करता दीड हजारात महिना घालवायचा कसा ? असा प्रश्‍न निराधारांना पडला आहे.

समाजातील निराधारांना उदरनिर्वाह चालविण्यासाठी आर्थिक परिस्थिती नसल्याने शासनामार्फत अनुदान दिले जाते. पूर्वी महिन्याला एक हजार अनुदान मिळत होते. त्यात पाचशे रुपयांची वाढ केल्याने जिल्ह्यातील ६३ हजार ४९६ लाभ मिळणार आहे.

दरम्यान, सध्याच्या काळात ५०० रुपयांमध्ये कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा करायचा? असा प्रश्‍न निराधारांनी उपस्थित केला आहे. आर्थिक स्थिती हलाखीची असणाऱ्यांना शासनामार्फत विविध योजनांसाठी अनुदान दिले जाते. गेल्या काही वर्षांत या योजनांत कुठलीही वाढ केली नव्हती.

शिंदे-फडणवीस सरकारने या योजनांच्या अनुदान रकमेत वाढ करण्याची घोषणा केली. मात्र, आधीच तुटपुंजी रक्कम निराधारांना दिली असून, त्यात आता पाचशे रुपयांची नाममात्र वाढ केली आहे. त्यामुळे आता लाभार्थी निराधारांना महिन्यात दीड हजार रुपये मिळणार असल्याचे संजय गांधी निराधार योजना विभागामार्फत सांगण्यात आले.

जिल्ह्यात संजय गांधी निराधार योजनेचे ३७ हजार ३२ लाभार्थी, श्रावणबाळ सेवा निवृत्तिवेतन योजनेचे १८ हजार ८७१, इंदिरा गांधी वृद्धापकाळ निवृत्तिवेतन योजनेचे सहा हजार १३२, इंदिरा गांधी विधवा निवृत्ती वेतन योजनेचे एक हजार ३३२, इंदिरा गांधी दिव्यांग निवृत्तिवेतन योजनेचे १०९ तर, राष्ट्रीय कुटुंब अर्थसाहाय्य योजनेचे २० लाभार्थी आहेत.

ते तरी वेळेत द्या..

जिल्ह्यात विविध योजनांचे निराधार लाभार्थी ६३ हजारांहून अधिक आहेत. या लाभार्थ्यांना शासनाकडून मिळणारे तुटपुंजे अनुदानही वेळेत मिळत नाही. अनुदानासाठी लाभार्थ्यांना चार ते पाच महिने वाट पाहावी लागते. वाढत्या महागाईचा विचार करता संसार चालवायचा कसा, प्रश्‍न निराधारांनी उपस्थित केला आहे.

सध्या महागलेल्या जीवनावश्‍यक वस्तू पाहता शासनाकडून वाढ झालेले पाचशे रुपये अगदीच तोकडे आहेत. सरकारला समाजातील अन्य घटकांवर खर्च करायला पैसे आहेत. मात्र, आमच्यासाठी सरकार हात आखडता घेत आहे. आहे ते अनुदानही वेळेत मिळत नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ठाणे हादरलं! ठाकरे गटाच्या नेत्यावर झाडल्या गोळ्या, उपचारावेळी मृत्यू

लालबाग राजाच्या चरणी भक्तांनी भरभरून दिलं दान; १२ दिवसात कोट्यवधींची रोकड

Exam Fee : दुष्काळग्रस्त भागातील दहावी बारावीच्या विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्क माफी

Motorcycle Accident : मोटरसायकलची समोरासमोर धडक होऊन दोन जण ठार :एक जखमी

CSK च्या कोचिंग स्टाफमध्ये बदलाचे वारे! झहीरपाठोपाठ माजी वेगवान गोलंदाजाचीही संघात एन्ट्री

SCROLL FOR NEXT