Governor Bhagat Singh Koshyari Discussion with District Collector on maan khatav water scheme sakal
सातारा

माणच्या पाणी योजनेसाठी राज्यपालांची जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा

माण-खटाव दुष्काळ हटाव समितीच्या सदस्यांनी आज टेंभू योजना पुर्ण करुन कुकुडवाड, वरकुटे मलवडी व पुकळेवाडी परिसराचा शेतीचा पाणी प्रश्न सोडवावा यासाठी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट

रुपेश कदम

दहिवडी : माण-खटाव दुष्काळ हटाव समितीच्या सदस्यांनी आज टेंभू योजना पुर्ण करुन कुकुडवाड, वरकुटे मलवडी व पुकळेवाडी परिसराचा शेतीचा पाणी प्रश्न सोडवावा यासाठी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली. या मागणीची दखल घेवून राज्यपालांनी तत्काळ जिल्हाधिकारी शेखर सिंग यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा करुन योग्य ती कार्यवाही करण्याची सुचना केली. राज्यपालांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे विरळी, कुकुडवाड, शेनवडी, चिलारवाडी, पुकळेवाडी, आगासवाडी, बनगरवाडी, वरकुटे मलवडी ही गावे सतत दुष्काळाचा सामना करीत आहेत.

जमिनीचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर असताना कोणतीही पाणी योजना येथे पोहोचली नाही. मंत्रालयात अनेक वेळा पाण्याची मागणी करण्यात आली. निवडणुका जवळ आली की शासन निर्णय काढले जातात, परंतु अंमलबजावणी होत नाही. त्यामुळे वरील गावांना कायमस्वरूपी पाणी कसे देता येईल याबाबत स्वतः लक्ष घालून सरकारला आदेश द्यावेत. तसेच संबंधित विभागाकडे बैठक लावून पाणी योजना कोणत्याही परिस्थितीत पूर्ण करण्यासाठी आदेश द्यावेत. या परिसराजवळून जात असलेली टेंभू योजना पुर्ण क्षमतेने कार्यान्वित करुन या संपुर्ण भागाचा पाणी प्रश्न निकाली काढावा अशी मागणी करुन या भागाच्या पाहणी दौ-यावर यावे अशी विनंती करण्यात आली.

या निवेदनाची तसेच चर्चेची दखल घेवून राज्यपालांनी जिल्हाधिकारी शेखर सिंग यांच्याशी दुरध्वनीवरुन चर्चा केली. तसेच पाणी योजना पुर्ण करण्यासाठी उचित कार्यवाही करण्याची सुचना केली. यावेळी चिन्मय कुलकर्णी, गणेश काटकर, प्रशांत गोरड, सचिन होनमाने, सतीश जाधव, रंगनाथ काटकर, रमेश काशीद, दादा पुकळे, संदीप नलावडे, धनश्री काटकर आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT