सातारा

प्रवास होणार सुखकर! सातारा-लोणंद मार्गासाठी तब्बल २३ कोटींचा निधी

Balkrishna Madhale

सातारा  : देशाच्या विकासात रस्तेही महत्त्वपूर्ण भूमिका बजावतात. चांगले रस्ते असल्यास वेगाने दळणवळण होते. यामुळे चांगले रस्ते नेहमीच विकासात हातभार लावतात. अशाच प्रकारे सध्या केंद्र शासनाने अनेक राज्यमार्गांना राष्ट्रीय महामार्गाचा दर्जा देऊन कामे सुरू केली आहेत. सातारा जिल्ह्यातूनही अनेक राष्ट्रीय महामार्ग जात आहेत. पुणे-बेंगलोर या चार क्रमांकाच्या राष्ट्रीय महामार्गाला तर यापूर्वीच आशियाई महामार्ग ४७ म्हणून मान्यता मिळाली आहे. तसेच आता शासनाकडून सातारा-लोणंद मार्गालाही भरघोस निधी मिळाला असून काम लवकर सुरू होणार आहे. शासनाने या मार्गाच्या मजबुतीकरणासाठी २३ कोटी ७५ लाख रुपयांची निविदा निश्चित केली आहे.

सातारा-लोणंद राज्यमार्ग चौपदरीकरणाला वेळ लागणार असल्याने सध्या असणारा रस्ता मजबूत करण्यासाठी लातूरच्या यश कन्स्ट्रक्शन या कंपनीला कामाची निविदा निश्चित झाली आहे. सातारा-लोणंद या एकूण ४४ किलोमीटर अंतरातील पहिल्या टप्प्यात सातारा ते वाठार स्टेशन या २६ किलोमीटरचे काम सुरू करण्यात येणार आहे. या कामात रुंदीकरण न करता असणारा रस्ता मजबूत करण्यात येणार आहे. या रस्ताच्या कामाची पहिली निविदा २४ मार्च २०२० रोजी काढण्यात आली आहे. अवघ्या नऊ महिन्यांत या रस्त्याचे काम पूर्णत्वास येणार आहे.

या मार्गावरील असणाऱ्या सर्व ब्रिटिशकालीन पुलांची देखील डागडुजी केली जाणार आहे. मात्र, सुरुवातीला २६ किलोमीटरचा रस्ता पूर्ण झाल्यानंतर उर्वरित काम हाती घेण्यात येणार आहे. गेली कित्येक वर्षांपासून दुर्लक्षित असणारा हा रस्ता मजबूत होत असताना आता या रस्त्यावरील अवजड वाहतुकीवर देखील नियंत्रण आणणे महत्त्वाचे आहे. अन्यथा हा रस्ता पुन्हा खराब होऊ शकतो. सातारा-लोणंद या रस्त्याचा प्रश्न सोडविण्यासाठी लोकप्रतिनिधींनी योग्यवेळी कार्यतत्परता दाखवल्याने वाहनधारक व शेतकऱ्यांची परवड आता थांबणार आहे. गेल्या अनेक दिवसांपासूनच प्रश्न सुटणार असल्याने या मार्गावरचा प्रवास आता सुखकर होणार आहे. या मार्गाला गेल्या कित्येक दिवसांपासून खड्ड्यांनी ग्रासले होते. याबाबत स्थानिकांनी वेळोवेळी आवाजही उठवला होता. मात्र, त्यास यश येत नव्हते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

तुकाराम मुढेंच्या कारवाईनंतर सरकारही अ‍ॅक्शन मोडमध्ये... खोकल्याच्या सिरपबाबत आरोग्य मंत्रालयाचा मोठा निर्णय!

एसीमध्ये जास्त वेळ बसल्याने खरंच सांधेदुखी वाढते का? ऑर्थोपेडिक तज्ज्ञांनी सांगितलं Body Stifness आणि वेदनांचं खरं कारण

CA जॉबचं आमिष, बार गर्लला लग्नाचं स्वप्न, बंदुकीचा धाक दाखवत जबरदस्तीचे संबंध... मुंबईत भाजपच्या बड्या नेत्याचा काळा चेहरा उघड

Pandharpur Murder Case: पंढरपुरात खळबळ! किरकोळ वादातून रिक्षाचालकाची निर्घृण हत्या; हत्येनंतर घराच्या दरवाराजा अडकवला पाय..

IND A vs SL A: '...त्यामुळे भारतीय खेळाडू संतापले', सुपर ओव्हरमधील श्रीलंकेच्या 'माइंड गेम'वर अश्विन थेटच बोलला

SCROLL FOR NEXT