सातारा

Gram Panchayat Results : महेश शिंदेंनी चाखली शशिकांत शिंदेंच्या गावात विजयाची ‘हॅट्‌ट्रिक’

सकाळ डिजिटल टीम

सातारा : जिल्ह्यातील 654 ग्रामपंचायत निवडणुकांची मतमोजणीस प्रारंभ झालेला आहे. जिल्ह्यातील नऊ हजार 521 उमेदवारांचे राजकीय भवितव्य आज ठरत आहे. सकाळी आठ वाजता टपाली मतदानाची मोजणी झाली. 

जिल्ह्यातील 878 ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया सुरू झाली होती. या निवडणुकीत 123 ग्रामपंचायती पूर्णत: बिनविरोध, तर 98 ग्रामपंचायती अंशत: बिनविरोध झाल्याने प्रत्यक्षात 654 ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसाठी उभे असलेल्या उमेदवारांचे राजकीय भवितव्य ता. 15 जानेवारीला मतपेटीत बंद झाले. जिल्ह्यातील काही संवेदनशील ग्रामपंचायतींचा निकाल लागल्यानंतर अनुचित प्रकार टाळण्यासाठी पोलिस बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. 

Gram Panchayat Results : बाळासाहेब पाटील, पृथ्वीराज चव्हाण, (कै.) उंडाळकर, अतुल भाेसले गटाचे वर्चस्व

काेरेगाव तालुक्यातील ल्हासूर्णे ग्रामपंचायतीत आमदार महेश शिंदे, तसेच सोपान मचींदर, किसनराव सावंत आदींच्या नेतृत्वाखालील नवलाईदेवी विकास पॅनलने नऊ विरुद्ध तीन जागा मिळवत विजय संपादन केला आहे. राष्ट्रवादी काॅंग्रेसचे आमदार शशिकांत शिंदे यांच्या नेतृत्वाखालील नवलाईदेवी परिवर्तन विकास पॅनेलचा हा मोठा पराभव मानला झात आहे. आमदार शशिकांत शिंदे यांच्या आपल्या स्वतच्या गावात (मतदार असलेल्या) विचाराच्या पॅनेलला सलग तीन वेळा पराभव स्विकारावा लागला आहे.

कोरेगाव तालुक्यातील मंगळापुर, पेठ कीन्हई व कठापुर ग्रामपंचायतीवर आमदार महेश शिंदे गट आघाडीवर

मंगळापुरमध्ये आमदार महेश शिंदे गट ७, आमदार शशिकांत शिंदे गट ० जागांवर आघाडी

पेठ कीन्हईत आमदार महेश शिंदे गट ५ तर आमदार शशिकांत शिंदे गट ४ जागांवर आघाडी 

कठापुरमध्ये आमदार महेश शिंदे गट ५ तर आमदार शशिकांत शिंदे गट ४ जागांवर आघाडीवर 

विसापूर : आमदार शशिकांत शिंदे यांच्या विचाराच्या सागर साळुंखे गटाने 13 पैकी 09 जागांवर विजय मिळवत ग्रामपंचायतीवर पुन्हा सत्ता कायम राखली.

जाखणगाव ग्रामपंचायतीवर आमदार महेश शिंदे यांच्या गटाचे वर्चस्व. सहा विरुद्ध तीनच्या फरकाने विजय.

बावधन (ता. वाई) सतारुद्ध भैरवनाथ ९ तर विरोधी बावधन विकास आघाडी ८ जागा.

ओझर्डे (ता. वाई) येथे सत्तांतर झाले आहे. शेतकरी विकास ९ तर सत्तारूढ ग्रामविकास ६ जागांवर विजय.

बनवडी (क-हाड) ग्रामपंचायतीत धक्कादायक सत्तांतर. सत्ताधारी शंकरराव खापे यांच्या जनसेवा पॅनेलला तीन जागा तर विरोधी जनशक्ती पॅनेलला 10 जागा मिळाल्या आहेत.

काले (ता. क-हाड) ग्रामपंचायतीत भाजप नेेते अतुल भोसले गटाचे जेष्ठ नेते भीमराव पाटील व दयानंद पाटील यांच्या गटाची सत्ता कायम त्यांच्या गटाला 14 जागा तर विरोधी गटाला फक्त 3 जागा.

सैदापुर ग्रामपंचायतीवर सैदापुर विद्यानगर आघाडीचे फत्तेसिंह जाधव यांचे वर्चस्व.

पाल ग्रामपंचायतीत सत्तांतर. राष्ट्रवादी काँग्रेसचे देवराज पाटील यांच्या पॅनलला झटका. विरोधी भाजप पुरस्कृत सुरेश पाटील यांची सत्ता.

भोसरे ता.खटाव महविकास आघाडी पुरस्कृत पॅनल नऊ शून्य अशी आघाडी.

कऱ्हाडला मतमोजणीस प्रारंभ; तासाभरात कळणार गावोगावच्या मतदारांचा काैल
 

चोरे ग्रामपंचायतीत बाबासाहेब चोरेकर पॅनेलचे विजयसिंह साळुंखे व बाळासाहेब साळुंखे यांच्या गटाची सत्ता कायम.

जखिंणवाडी ग्रामपंचतीत पृथ्वीराज चव्हाण गटाचे नरेंद्र नांगरे पाटील यांची सत्ता कायम

Edited By : Siddharth Latkar

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sharad Pawar: शरद पवारांच्या ताफ्यातील गाड्या एकमेकांना धडकल्या, मोठा अनर्थ टळला!

T20 World Cup 2024: ICC ची मोठी घोषणा! वर्ल्ड कपसाठी अंपायर अन् मॅच रेफ्रींची झाली निवड, पाहा संपूर्ण यादी

Arvind Kejriwal: "....म्हणून आम्ही केजरीवालांच्या जामिनाचा विचार करु शकतो"; सुप्रीम कोर्टाचा ईडीला इशारा

Sobita Dhulipala :"हो मी प्रेमात आहे" ; शोबिताने दिली नागा चैतन्यवरील प्रेमाची कबुली ?

OpenAI लाँच करणार गुगलला टक्कर देणारं सर्च इंजिन! जाणून घ्या काय असेल खास?

SCROLL FOR NEXT