Satara Latest Marathi News Satara Politics News 
सातारा

Gram Panchayat Results : सातारा जिल्ह्यातील 'या' उमेदवारांचं चिठ्ठीव्दारे उघडलं नशीब; जनतेनं दिला 'समान' कौल

अशपाक पटेल

खंडाळा (जि. सातारा) : निवडणूक म्हटलं की भाऊबंदकी, इर्ष्या, खुन्नस या सगळ्या गोष्टी आल्याच, या सगळ्यातून मार्ग काढत उमेदवाराला निवडणूक जिंकावी लागते. निवडणूक काळात शत्रूलासुध्दा मित्र बनवावे लागेत, तेव्हाच उमेदवारा विजयी हासिल करण्यास सोपे होते. मात्र, इतकं सगळं करुनही पराभव झाला, तर उमेदवाराला निराशा पत्करावी लागेत. यातही उमेदवारांना समसमान मतं मिळाली की, विजयी उमेदवार घोषित करण्यात अडचण निर्माण होते. असाच काहीसा प्रकार सातारा जिल्ह्यात ग्रामपंचायत निवडणुकीच्या मतमोजणी प्रसंगी पहायला मिळाला.   

कोपर्डे येथे भानुदास ठोंबरे व अभिजीत शिंदे यांना समसमान 315 मते पडल्याने चिठ्ठी काढण्यात आली. यात भानुदास ठोंबरे विजयी झाले, शिंदेवाडीत वैशाली हिंमत सोनावणे व अनिता रामदास जाधव यांना समसमान 197 मते पडली. यात चिठ्ठी काढल्यावर अनिता जाधव यांना विजयी घोषित करण्यात आले. तसेच वडगावात रुपाली खामकर व दिपाली पवार यांना 71 अशी समसमान मते पडल्यानंतर चिठ्ठीव्दारे दिपाली पवार लकी ठरल्या. त्यामुळे मतदारांनी या सर्व उमेदवारांना दिलेला कौल चिठ्ठीव्दारे अजमावल्याने पराभव उमेदवारांची पुरती निराशा झाली आहे.

आज ग्रामपंचायतीच्या धक्कादायक निकालाने दिग्गजांचे भवितव्य संपुष्टात आणले आहे, तसेच अनेकांची प्रतिष्ठा या निवडणुकीत पणाला लागली होती. मात्र, यात काहींचा विजय झाला, तर काहींना पराभवाला सामोरे जावे लागले, तर समसमान मतांची विभागणी झाल्यामुळे काहींचा निकाल चिठ्ठीव्दारे घेण्यात आला, तसेच अनेक पंचायतीत अवघ्या एका मताने पराभव झाल्याचेही चित्र आहे.

संपादन : बाळकृष्ण मधाळे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

SMAT 2025: T20 सामन्यात सुपर ओव्हरचा ड्रामा! अभिषेक शर्मा गोल्डन डकवर बाद, CSK च्या गोलंदाजांनं दोनदा धाडलं माघारी

Latest Marathi News Live Update : वर्सोवा बीचवर महिलेला जीवे धमकी; आरोपीकडून पिस्तूल-चॉपर जप्त

Vitamin C Serum: हिवाळ्यातील ड्राय स्किनसाठी घरच्या घरी बनवा 'व्हिटॅमिन C' सीरम, जाणून घ्या सोपे आणि उत्तम उपाय

Kolhapur Politics : अपक्षांचा खेळ उधळणार? कागल निवडणुकीत मतांसाठी गट-तटांची धडपड आणि राजकीय रणनीतीने तापला माहोल

Video: भिंत पाडण्यासाठी आमदार स्वतः चढले जेसीबीवर; दिलीप लांडेंचा व्हिडीओ व्हायरल

SCROLL FOR NEXT