Satara Latest Marathi News Satara Politics News 
सातारा

Gram Panchayat Results निढळला दहा वर्षांनंतर सत्तांतर; माजी सनदी अधिकाऱ्यांच्या गटाला जोर का झटका

रुपेश कदम

दहिवडी (ता. माण) : जिल्ह्यातील बहुतांशी आदर्श गावांत सत्तांतर झाल्याचे चित्र आहे. खटाव तालुक्यातील निढळ हे माजी सनदी अधिकारी चंद्रकांत दळवी यांचे आदर्श गाव आहे. येथील ग्रामपंचायत निवडणुकीत तब्बल दहा वर्षानंतर सत्तांतर झाले. यामध्ये कोरेगावचे आमदार महेश शिंदे यांच्या गटाने एकहाती सत्ता मिळविली आहे. चंद्रकात दळवी यांच्या गटाला केवळ दोन जागा मिळाल्या आहेत.  

निढळ हे खटाव तालुक्यातील आदर्श गाव असून माजी सनदी अधिकारी चंद्रकांत दळवी यांच्या माध्यमातून कोट्यवधी रूपयांची विकास कामे झाली आहेत. जिल्ह्यातील निढळ हे पहिले आदर्श गाव आहे. या ग्रामपंचायतींच्या निवडणुकीत यावेळेस तब्बल दहा वर्षांनंतर सत्तांतर झाले आहे. 

या निवडणुकीत चंद्रकांत दळवी यांच्या गटाच्या पॅनेल विरूध्द कोरेगावचे आमदर महेश शिंदे यांच्या गटाचे जी. डी. खुस्पे यांचे पॅनेल अशी लढत झाली. यामध्ये आमदार महेश शिंदे यांच्या गटाच्या पॅनेलने नऊ जागा जिंकत निढळ ग्रामपंचायतीत तब्बल दहा वर्षानंतर सत्तांतर घडविले, तर चंद्रकांत दळवी यांच्या गटाच्या पॅनेलला केवळ दोन जागा मिळाल्या आहेत.

संपादन : बाळकृष्ण मधाळे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dombivli Crime : डोंबिवलीत अल्पवयीन मुलीचा विनयभंग, रामनगर पोलीस ठाण्यात पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल; 37 वर्षीय व्यक्तीला पोलिसांनी केली अटक

तो फार कमी कार्यक्रमांना यायचा... अदिती द्रविडने सांगितला काका राहुल द्रविडसोबतचा बालपणीचा अनुभव

Latest Marathi News Live Update: ॲग्रीस्टॅकमुळे कापूस खरेदी नोंदणी जलद होणार - जयकुमार रावल

अखेर मृण्मयी देशपांडेच्या ‘मना’चे श्लोक' चित्रपटाचं नाव बदललं; आता 'या' नावाने येणार प्रेक्षकांच्या भेटीला

Crop Insurance Scam : विमा कंपनीचा शेतकऱ्यांवर अन्याय; 15 हजार 200 रुपयांच्या हप्त्याला फक्त 5994 रुपये भरपाई

SCROLL FOR NEXT