सातारा

रुईघर उपसरपंचांवरील अविश्‍वास ठराव मंजूर

रविकांत बेलोशे

भिलार (जि. सातारा) : रुईघर (ता. जावळी) ग्रामपंचायतीच्या उपसरपंच सुनंदा अशोक बेलोशे यांच्याविरुद्ध अखेर अविश्‍वास ठराव मंजूर करण्यात आला. उपसरपंचांच्या विरोधात राजेंद्र पाटणे, लक्ष्मी बेलोशे, सचिन कांबळे या सदस्यांनी अविश्वास ठराव दाखल केला होता.

या अविश्वास ठरावावर चर्चा करण्यासाठी तहसीलदार राजेंद्र पोळ यांनी मंगळवारी विशेष सभा बोलावली होती. चर्चेअंती तिन्ही सदस्य ठाम राहिले. त्यानंतर रुईघर येथील जननीमाता मंदिरात विशेष ग्रामसभा झाली. अध्यक्षस्थानी तहसीलदार राजेंद्र पोळ होते. 

बेफिकीर पर्यटकांना पाचगणी पालिकेचा दणका; दोन लाखांचा दंड वसूल

ही सभा सुरू झाल्यानंतर मतदान घेण्यात आले. त्यावेळी 347 मतदारांनी आपला हक्क बजावला. त्यापैकी ठरावाच्या विरुद्ध 130 मते, तर ठरावाच्या बाजूने 191 मते पडली. 26 मते बाद झाली. त्यामुळे 61 मतांनी उपसरपंचांवरील अविश्वास ठराव विशेष ग्रामसभेने मंजूर केला.

'गाव करील ते राव काय करील', म्हण सार्थ ठरविण्याची हीच ती वेळ : उदयनराजे

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tesla Car Booking Offer: बंपर ऑफर...! आता फक्त २२ हजारांत बुक करता येणार 'टेस्ला'ची अलिशान कार, मात्र...

Sangli Crime : वाढत्या गुन्हेगारीची गृह विभागाकडून दखल; जिल्हा प्रशासन, पोलिसांचे मॅरेथॉन बैठक; अहवाल लवकरच मुख्यमंत्री फडवणीस यांच्याकडे

Vaishnavi Hagawane Case Update : नीलेश चव्हाणच्या जामीन अर्जावर २२ जुलैला सुनावणी; वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरण

Pune Crime : गोकुळनगरमध्ये तरुणावर कोयत्यांनी हल्ला करणाऱ्या आरोपींना अटक

Mumbai News: गेट वे ऑफ इंडियाजवळील प्रवासी जेट्टीचा मार्ग मोकळा

SCROLL FOR NEXT