सातारा

'माझे कुटुंब, माझी जबाबदारी' मोहिमेवर गटप्रवर्तकांचा बहिष्कार

Balkrishna Madhale

सातारा : प्राथमिक आरोग्य केंद्रांकडे गटप्रवर्तक म्हणून कार्यरत असलेल्या महिलांना तुटपुंजे मानधन देवून त्यांची बोळवण केली जात असून त्या शासनाच्या अधिकृत कर्मचारी नसतानाही त्यांना अतिरिक्त जबाबदारी दिली जात आहे. त्याचा निषेध म्हणून गटप्रर्वतकांनी माझे कुटुंब, माझी जबाबदारी मोहिमेच्या कामावर बहिष्कार टाकला आहे. जून महिन्यातील जीआरनुसार गटप्रवर्तकांना 3 हजार मानधन फरकासह लागू करावे यासह अनेक मागण्यांचे निवेदन गटप्रवर्तकांनी सातारा पंचायत समितीच्या तालुका आरोग्य अधिका-यांना दिले आहे.  

चिंचणेर वंदन, कण्हेर, नागठाणे, नांदगाव, लिंब, कुमठे, परळी, ठोसेघर प्राथमिक आरोग्य केंद्रातील प्रवर्तकांनी दिलेल्या निवेदनात त्यांनी म्हटले आहे की, गेली 10 वर्षे अत्यंत तुटपुंज्या मानधनावर काम करत आहोत. शासनाने मानधन वाढवण्याऐवजी मानधन कपात करण्याच्या हालचाली सुरु केल्या आहेत, तर सन 2020-21 च्या कृती आराखड्यात दैनंदिन फिरती भत्ता नामंजूर करत आमच्यावर अन्यायच केला आहे. कोरोना रिर्पोटिंग व सुपरव्हिजनसाठी गटप्रवर्तकांना महिना 500 रुपये म्हणजे दिवसाला फक्त 16 रुपये भत्ता देवून आर्थिक कुचंबणा केली जात आहे. या कामासाठी दैनंदिन 500 रुपये भत्ता दिला पाहिजे. 

जून महिन्यातील जीआरनुसार गटप्रवर्तकांना 3 हजार रुपये मानधन फरकासह लागू करावे, ऑनलाईन काम करताना देण्यात येणारा 250 रुपये भत्ता बंद केलाय तो सुरु करावा, मोबाईल भत्ता फक्त 150 रुपये देण्यात तो 500 रुपये करावा, अशा मागण्या करण्यात आला आहेत. आम्ही शासनाचा रेग्युलर स्टाफ नाही, कामावर आधारित मोबादला शासन देत असल्याने माझे कुटुंब, माझी जबाबदारी मोहिमेच्या कामाची जबाबदारी गटप्रवर्तकांना देवू नका, अशीही मागणी केली आहे. या निवेदनावर सातारा तालुक्यातील गटप्रवर्तक दीपाली फडतरे, सुषमा चव्हाण, वैशाली भोसले, सुजाता जाधव, संगिता कदम, सरिता बोराडे, रेखा क्षीरसागर, चित्रा झिरपे, सुमन महाडिक, स्वाती कुंभार, विजया माने, सुनिता फाळके, वर्षाराणी वाघ, कांचन कणसे, रेश्मा पवार, श्वेतांबरी जगताप, कविता किर्तीकर यांच्या स्वाक्ष-या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Patas Sugar Factory: पाटस साखर कारखान्यात बगॅसला भीषण आग; ट्रक जळून खाक, अग्निशामक यंत्रणा उशिरा पोहोचली अन्..

Summer Holiday : शाळांना २ मेपासून उन्हाळी सुटी; नवीन शैक्षणिक वर्ष १५ जूनपासून

Claude Mythos Leak : सायबर कंपन्यांना धक्का! AI क्लॉड मिथोस लीकमुळे शेअर मार्केट कोसळले; एका दिवसात १४.५ अब्ज डॉलर्सचे नुकसान

Latest Marathi News Live Update : अशोक खरात प्रकरणी रुपाली चाकणकरांची आज SIT चौकशी होणार?

राष्ट्रवादी एकत्र येणार? चर्चांना उधाण; विलीनीकरणावर सुनील तटकरेंचे मोठे विधान, म्हणाले...

SCROLL FOR NEXT