सातारा

पाटणमधील अतिवृष्टीबाधितांचे पुनर्वसन करण्यात येईल: पालकमंत्री पाटील

विजय लाड ः सकाळ वृत्तसेवा

बाधितांचे चांगल्या पध्दतीने पुनर्वसन करण्यात येईल, अशी ग्वाही पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी दिली.

कोयनानगर (सातारा): पाटण तालुक्यातील विविध गावांमध्ये अतिवृष्टी झाल्याने भूस्खलन झाले आहे. या भूस्खलनामध्ये मोठया प्रमाणात जीवितहानी झाली आहे. बाधितांच्या पाठीशी शासन खंबीरपणे उभे आहे. बाधितांचे चांगल्या पध्दतीने पुनर्वसन करण्यात येईल, अशी ग्वाही पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी दिली. 

कोयनानगर येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक केंद्र शाळेत अतिवृष्टीमध्ये मृत्यू झालेल्यांच्या वारसांना सानुग्रह अनुदानाचे धनादेश पालकमंत्री पाटील यांच्या हस्ते वारसांना वाटप करण्यात आले. यावेळी जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी मनोगत व्यक्त केले. राज्य आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून चार तर मुख्यमंत्री सहायता निधीतून एक असे पाच लाख रुपयाचे सानुग्रह अनुदान बाधीतांना देण्यात आले. यावेळी पालकमंत्री श्री. पाटील बोलत होते. गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई, जिल्हाधिकारी शेखर सिंह, मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा, पोलीस अधिक्षक अजयकुमार बन्सल, पाटणचे प्रांताधिकारी श्रीरंग तांबे, सत्यजित पाटणकर आदी उपस्थित होते.

पालकमंत्री पाटी म्हणाले, पाटण तालुक्यातील विविध गावांमध्ये झालेल्या भूस्खलनातील जिवीत हानीबरोबर मालमत्तेचेही मोठे नुकसान झाले आहे. मिरगाव येथे बचाव कार्यासाठी रस्ते नव्हते, कोयनेच्या बॅक वॉटरमधून एनडीआरएफ च्या टीमने व स्थानिकांच्या मदतीने बचाव कार्य सुरु केले. आपत्तीग्रस्तांच्या भावना मंत्रीमंडळाच्या बैठकीत मांडल्या जातील. भविष्यात भूस्खलनाची थोडीतरी कल्पना आली तरी त्याची तात्काळ माहिती प्रशासनाला द्यावी.

गृहराज्यमंत्री देसाई म्हणाले, तालुक्यातील ज्या गावात आजची परिस्थिती निर्माण झाली त्या सर्व गावांना भेटी दिल्या व तेथील नागरिकांच्या भावना ऐकून घेतल्या. या सर्व भावना शासनाच्या दरबारी मांडणार आहे. राज्य शासन आपत्तीग्रस्तांच्या पाठिशी असून त्यांच्या पुनर्वसनासाठी प्रयत्न करणार असल्याचे व तात्पुरत्या निवाऱ्यासाठी प्रयत्न करणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Commonwealth Games 2026 : आजोबा भाजी विकायचे, वडील शिवणकाम करतात... लव्हप्रीतने भारतासाठी जिंकले ऐतिहासिक पदक!

Commonwealth Games 2026 : घोर निराशा... तजिंदरपाल सिंग तूर पदक जिंकण्यापासून वंचित, समरदीप सिंगलाही अपयश; नेमकं कुठे चुकले?

Anti paper leak bill: विरोधकांचा सभात्याग अन् 'पेपरफुटी'विरोधी विधेयक राज्यसभेत मंजूर; अंतिम मंजुरीसाठी राष्ट्रपतींकडे पाठवले जाणार

Phule Wada Memorial Delay: फुले वाडा व सावित्रीबाई फुले स्मारकाचे काम संथ; छगन भुजबळ यांची पुणे महापालिकेवर कडक टीका

Pune Police Misconduct: तपासाऐवजी पर्यटन; विश्रामबागेतील तीन पोलिसांवर कारवाई, दोन वर्षे वेतनवाढ रोखली

SCROLL FOR NEXT