Shambhuraj Desai vs Uddhav Thackeray esakal
सातारा

Shambhuraj Desai : 'आयोगानं धनुष्यबाण चिन्ह आम्हाला दिलंय, त्यामुळं शिवसेना फुटली असं कोणीच म्हणू शकत नाही'

शिवसेना (Shiv Sena) ही फुटलेली नाही. मूळ शिवसेना ही आमची आहे.

हेमंत पवार

शिवसेना फोडणाऱ्या वालीचा मी वध करणार असे वक्तव्य शिवसेनाप्रमुख ठाकरे यांनी केले. त्यावर प्रतिक्रिया देताना मंत्री देसाई बोलत होते.

कऱ्हाड : शिवसेना (Shiv Sena) ही फुटलेली नाही. मूळ शिवसेना ही आमची आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेना हे आम्हाला नाव दिले आहे. शिवसेनेचे धनुष्यबाण चिन्ह हे आम्हाला दिले आहे. त्यामुळे शिवसेना फुटली असे कोणी म्हणू शकत नाही. शिवसेना प्रमुखांच्या ज्वलंत विचाराशी प्रतारणा कोणी केलेली आहे, याचे आत्मपरीक्षण आमच्यावर टीका करणाऱ्यांनी करावे, असा पलटवार पालकमंत्री शंभूराज देसाई (Shambhuraj Desai) यांनी शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर केला.

शिवसेना फोडणाऱ्या वालीचा मी वध करणार असे वक्तव्य शिवसेनाप्रमुख ठाकरे यांनी केले. त्यावर प्रतिक्रिया देताना मंत्री देसाई बोलत होते. ते म्हणाले, ‘‘नियमाने कायद्याने, घटनेने ज्यांना निर्णय घेण्याचा अधिकार आहे. त्या केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेना ही आम्हाला दिलेली आहे. उद्धव बाळासाहेब ठाकरे (Uddhav Thackeray) गटाची मंडळी त्याच्यावर न्यायालयात गेली. न्यायालयानेही त्यांचे ऐकले नाही. राज्य न्यायाने, घटनेने चालते.

आम्ही कायद्याच्या चौकटीत राहून योग्य निर्णय घेतलेले आहेत. त्यामुळे ज्यांनी वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारापासून अडीच वर्षे मुख्यमंत्री पदासाठी, सत्तेसाठी बाजूला गेले. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी काँग्रेसला बरोबर घेणार नाही. माझ्या पक्षाची मी काँग्रेस होऊ देणार नाही, असे सांगितले होते. त्याच्या बरोबर उलटी कृती ठाकरे गटाने केली.’’

सत्तेसाठी ज्यांच्या विरुद्ध लढले त्यांच्याबरोबर जाऊन ते सत्तेत बसले. त्यामुळे शिवसेना प्रमुखांच्या ज्वलंत विचाराशी प्रतारणा कोणी केलेली आहे याचे आत्मपरीक्षण आमच्यावर टीका करणाऱ्यांनी करावे असे त्यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

दुष्काळात वगळलेल्या तालुक्यांचाही यादीत समावेश; मंत्रिमंडळ बैठकीत राज्य सरकारचा निर्णय

Central Railway: प्रवाशांनो लक्ष द्या! मध्य रेल्वेवर ७५ दिवसांचा विशेष ब्लॉक, मेल/एक्सप्रेसच्या वेळापत्रकात बदल

Retirement Planning: रिटायरमेंटनंतर आरामात जगण्यासाठी 1.5 कोटी पुरेसे नाही? HDFC पेन्शनच्या अहवालातून मोठा खुलासा

Marathi News Live Updates: पुण्यात राष्ट्रीय समाज पक्षातर्फे सोशल मीडिया प्रबोधन शिबीर

Community Book Bank: ममदापुरात लोकसहभागातून जिल्हा परिषद शाळेत बुक बँक सुरू; ग्रामीण विद्यार्थ्यांसाठी अवांतर वाचनाचे नवे दालन

SCROLL FOR NEXT