Handwash station  Sakal
सातारा

दोनशे शाळांत होणार हॅण्डवॉश स्टेशन

महत्त्‍वाकांक्षी प्रकल्प; विद्यार्थ्यांच्या स्वच्छतेसाठी बीडीओ शशिकांत शिंदेंचा उपक्रम

हेमंत पवार, कऱ्हाड

कऱ्हाड - अस्वच्छेतमुळे रोगराईला आमंत्रण मिळते. कोरोनासारख्या महामारीच्या काळात स्वच्छतेचे महत्त्‍व अधोरेखित झाले. त्याचा विचार करून लहान वयातच मुलांना स्वच्छतेची सवय लागावी, या हेतूने कऱ्हाडचे गटविकास अधिकारी शशिकांत शिंदे यांनी पंधराव्या वित्त आयोगाच्या निधीतून सुमारे अडीच ते तीन कोटी रुपये खर्चून तालुक्यातील २०० शाळांत हॅण्डवॉश स्टेशन उभारण्यात येत आहेत. जून महिन्यापर्यंत सर्व शाळांत ती उभारली जाऊन विद्यार्थ्यांना नवीन वर्षात ती वापरायला मिळणार आहेत. या महत्त्‍वाकांक्षी प्रकल्पाला गावोगावच्या सरपंच, उपसरपंच, ग्रामसेवकांनीही चांगली साथ दिली आहे.

ग्रामीण भागात स्वच्छतेचा अभाव असतो. नेमके त्यामुळेच आजारी पडण्याचे, रोगराई पसरण्याचे प्रमाणही अधिक असते. तीच स्थिती अनेक शाळांतही पाहायला मिळते. कोरोना महामारीच्या संकटाने सर्वांना जागे करून वैयक्‍तिक स्वच्छतेची सवय लावली. त्यामुळे वारंवार हात धुणे, स्वच्छ कपडे घालणे, मास्क वापरणे यांसारख्या सवयी अंगीकाराव्या लागल्या. आपण साधारणपणे हातानेच सर्व गोष्टी करत असतो. त्यामुळे हात स्वच्छ असणे आवश्यक असते. त्याचा विचार करून हात स्वच्छ ठेवण्याची सवय लहान वयातच मुलांना लागावी, या हेतूने गटविकास अधिकारी शिंदे यांनी एक पाऊल पुढे जाऊन तालुक्यातील २०० शाळांत हॅण्डवॉश स्टेशन सुरू करण्याचा महत्त्‍वाकांक्षी उपक्रम हाती घेतला आहे. त्याव्दारे विद्यार्थी शाळेत आल्यानंतर वारंवार हात धुवून स्वच्छ राहतील आणि त्यांना रोगराईपासून दूर ठेवता येईल, हा हेतू त्यामागे ठेवण्यात आला आहे. त्यासाठी ग्रामपंचायतीच्या १५ व्या वित्त आयोगातील निधीतून तरतूद करण्यात आली आहे. त्यासाठी संबंधित ग्रामपंचायतीचे सरपंच, उपसरपंच, ग्रामसेवक यांनी चांगले सहकार्य केले आहे. २०० ग्रामपंचायतींच्या माध्यमातून सुमारे अडीच ते तीन कोटी रुपये त्यासाठी खर्च करण्यात येणार आहेत. सध्या सर्वच शाळांतील कामे सुरू असून ३४ शाळांतील कामे पूर्णत्वाकडे आली आहेत. जून महिन्यात सुरू होणाऱ्या शाळांच्या नवीन वर्षात विद्यार्थ्यांना ती हॅण्डवॉश स्टेशन वापरायला मिळणार आहेत.

शुध्द पिण्याच्या पाण्याचीही सोय

हॅण्डवॉश स्टेशनसाठी स्वतंत्र पाण्याची टाकी व यंत्रणा उभारण्यात येणार आहे. त्यासाठीची कार्यवाही सध्या सुरू आहे. त्या टाकीमध्येही वेगळी व्यवस्था करून विद्यार्थ्यांना शुध्द आणि स्वच्छ पाणी पिण्यास मिळावे, यासाठीही कार्यवाही करण्यात येणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांची पिण्याच्या पाण्याची चांगली सोय होणार आहे.

विद्यार्थ्यांना लहान वयातच स्वच्छतेची सवय लागावी, त्यांना शुध्द पाणी पिण्यास मिळून त्यांचे आरोग्य चांगले राहावे, यासाठी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामपंचायतीच्या सहकार्यातून कऱ्हाड तालुक्यातील २०० शाळांत हॅण्डवॉश स्टेशन उभी करत आहोत. नवीन वर्षात विद्यार्थ्यांना ती वापरायला मिळतील.

- शशिकांत शिंदे, गटविकास अधिकारी, कऱ्हाड.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai: उघड्या मॅनहोलमध्ये पडलेल्या व्यक्तीचा मृत्यू, BMC चा निष्काळजीपणा जीवावर बेतला... माणूस पडतानाचा Video समोर... बचावकार्य अपयशी

Mumbai Pune Red Alert : राज्यात मान्सूनची दमदार वाटचाल ! पुढील ४ दिवस पावसाचे; मुंबई, पुण्यासह 'या' जिल्ह्यांत रेड अलर्ट

Latest Marathi News Live Update : मालेगाव महापालिकेवर 'लँड जिहाद विरोध' जनआक्रोश मोर्चा

Mumbai Manhole Accident : मुंबईत २० ते २५ फूट खोल उघड्या मॅनहोलमध्ये माणूस पडला; बचावकार्य सुरू... BMC चा निष्काळजीपणा चव्हाट्यावर

अटल टनेलजवळ भीषण अपघात, बोगद्यातून बाहेर येताच स्कॉर्पिओ थेट नदीत बांधकाम सुरू असलेल्या पिलरवर लटकली, VIDEO VIRAL

SCROLL FOR NEXT