Harihareshwar bank sakal
सातारा

हरिहरेश्‍वर बॅंक घोटाळ्याचा तपास ईडीकडे सोपवा : खातेदार कृती समिती

वाई येथील हरिहरेश्‍‍वर बँकेच्या दीड हजार खातेदारांची तब्बल ४० कोटींची फसवणूक विद्यमान संचालकांनी केली आहे.

गिरीश चव्हाण

सातारा : वाई येथील हरिहरेश्‍‍वर बँकेच्या (Harihareshwar bank) दीड हजार खातेदारांची तब्बल ४० कोटींची फसवणूक विद्यमान संचालकांनी केली आहे. या घोटाळ्यातील संशयित राजरोस फिरत असतानाही पोलिसांकडून कारवाई (Police Action) होत नसल्‍याचा आरोप करत या प्रकरणाची चौकशी प्रवर्तन संचालनालय अथवा केंद्रीय गुन्हे अन्वेषणमार्फत (CBI) करण्‍याची मागणी हरिहरेश्‍‍वर बँक खातेदार कृती समितीच्या वतीने आज येथे पत्रकार परिषदेत करण्‍यात आली. या प्रकरणी उच्च न्यायालयात (High Court) जनहित याचिका दाखल करणार असून न्याय न मिळाल्यास जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आत्मदहन करण्याचा इशारा समितीच्या वतीने नितीन सावंत यांनी दिला.

श्री. सावंत म्‍हणाले, ‘‘हरिहरेश्‍‍वर बँकेच्या वाई, भुईंज, वडूथ आणि खंडाळा येथे चार शाखा असून त्यातील दीड हजार खातेदारांची ४० कोटींची फसवणूक विद्यमान संचालकांनी संगनमताने केली आहे. या प्रकरणी २९ जणांवर वाई शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल असून त्‍यातील पाच जणांना अटकपूर्व जामीन मिळाला आहे.

हे प्रकरण आर्थिक गुन्हे शाखेकडे तपासासाठी असून त्‍यात चार महिने झाले तरी कोणालाही अटक झालेली नाही.’’ प्रकरणाचा पाठपुरावा करणाऱ्या खातेदारांनाच गुन्‍हा दाखल करण्‍याची धमकी पोलिस देत आहेत. पोलिसांबरोबरच जिल्हा उपनिबंधक कार्यालयही खातेदारांना सहकार्य करत असल्‍याचा आरोपही सावंत यांनी यावेळी केला. याप्रकरणी न्यायालयात याचिका दाखल करणार असून न्‍याय न मिळाल्‍यास आत्‍मदहन करण्‍याचा इशाराही सावंत यांनी दिला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT