सातारा

कोरोनातही लसीकरणाचे 95 टक्के उद्दिष्ट पूर्ण; तासात दहा जणांना लस

प्रशांत घाडगे

सातारा : मागील सात महिन्यांपासून कोरोनाचा फैलाव संपूर्ण जगभरात पसरलेला आहे. या काळातही जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने जिल्हाभरात सरासरी 95 टक्के लसीकरणाचे उद्दिष्ट पूर्ण केले आहे. याचबरोबर कोरोनामुळे लसीकरण सत्राच्या ठिकाणी एका तासात दहा लाभार्थींना लस देण्याचे नियोजन आरोग्य विभागाने केले आहे. 

मार्च महिन्यापासून जगभरात कोरोनाच्या साथीने थैमान घातल्याचे दिसत आहे. यामुळे मार्च, एप्रिल, मे, जून या महिन्यांत संपूर्ण देशात लॉकडाउन घोषित करण्यात आले. या कालावधीत अत्यावश्‍यक सेवा वगळता सर्व व्यवहार ठप्प झालेले होते. परंतु, आरोग्यविषयक अत्यंत आवश्‍यक असणाऱ्या लसीकरणाच्या मोहिमेचे उद्दिष्ट कोरोनाच्या सहा महिन्यांतही जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने पूर्ण करण्याचा प्रयत्न केला. तसेच कोविडमुळे एखाद्या परिसरात लसीकरण रद्द झाल्यास पुढील महिन्यात सत्राचे आयोजन केले जात असल्याचे आरोग्य विभागाने स्पष्ट केले. 

कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर लसीकरण टप्प्याटप्प्याने सुरू आहे. यामध्ये दर महिन्याला जिल्ह्यामध्ये 1836 लसीकरण सत्रांचे आयोजन केले जात आहे. यामधील 288 लसीकरण सत्रे आरोग्य संस्थेत, तर अंगणवाडी, ग्रामपंचायत, समाजमंदिरे आदी ठिकाणी 1548 सत्रे आयोजित केली जातात. या लसीकरण मोहिमेत गरोदर माता, पूर्ण संरक्षित बालके आदींना पोलिओ, धनुर्वात, गोवर रुबेला, हिपॅटायटिस बी, रोटा व्हायरस, कावीळ आदी प्रकारच्या लस देण्यात येतात. सद्य:स्थितीत जगभरात कोरोनाच्या संसर्गाने भीतीदायक चित्र निर्माण झाले आहे. या संसर्गामुळे ठिकठिकाणी बाधित रुग्णांचे प्रमाण वाढत आहे. एखाद्या ठिकाणी कोरोनाबाधित रुग्ण आढळल्यास तेवढाच कंटेनमेंट झोन वगळून इतर ठिकाणी लसीकरण सुरू असल्याचे आरोग्य विभागाने सांगितले आहे. 

जिल्ह्यातील लसीकरण (एप्रिल ते ऑगस्ट) 
-गरोदर माता : 99 टक्के 
-पूर्ण संरक्षित बालके : 93 टक्के 
-डीपीटी, पोलिओ बूस्टर : 92 टक्के 
-गोवर रुबेला : 89 टक्के 
-बीसीजी : 93 टक्के

कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर संपूर्ण जिल्हाभरात लसीकरण मोहिमेची सत्रे आयोजित करत लसीकरणाचे उद्दिष्ट पूर्ण केले जात आहे. याचबरोबर, नागरिकांनी पाच वर्षांच्या आतील बाळाचे लसीकरण पूर्ण झाले नसल्यास जवळच्या आरोग्य सेविका, आशा सेविका यांच्याशी संपर्क करावा. 
-डॉ. अनिरुध्द आठल्ये, जिल्हा आरोग्य अधिकारी 

संपादन : बाळकृष्ण मधाळे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

३० हजार फूट उंचीवर मृत्यूशी झुंज! इंडिगो विमानात घडलेला तो थरारक क्षण! कोल्हापूरकर डॉक्टर बनल्या 'देवदूत'

'नगर तालुक्यातील कांदा व्यापाऱ्याची ८२ लाखांची फसवणूक'; अनेक दिवस कांदा खरेदी-विक्रीचा व्यवहार झाला अन्..

दुर्दैवी घटना! 'बिबट्याच्या हल्ल्यात चिमुकल्याचा मृत्यू'; संगमनेर तालुक्यातील घटना, आईचा काळीज पिळवटणारा आक्राेश, अंगणात खेळत हाेता अन्..

IND vs SA, 3rd T20I: भारतीय गोलंजांचा अचूक माऱ्यासमोर द. आफ्रिका १२० धावांच्या आतच ऑलआऊट; भारतासमोर सोपं टार्गेट

Latest Marathi News Update: दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्या वाचा एका क्लिकवर...

SCROLL FOR NEXT