girish mahajan and sanjay raut esakal
सातारा

Karad News : आरोग्य यंत्रणा नाही तर सामनाच व्हेंटिलेटरवर; गिरीश महाजनांची खासदार राऊतांवर टीका

खासदार संजय राऊत काहीही बोलत असतात. सध्या त्यांचा सामनाच व्हेंटिलेटरवर आहे.

हेमंत पवार

कऱ्हाड - खासदार संजय राऊत काहीही बोलत असतात. सध्या त्यांचा सामनाच व्हेंटिलेटरवर आहे. शासकीय रुग्णालयात एका दिवसात 24-25 मृत्यू होणे ही चुकीची बाब आहे. घडलेली घटना ही सरकार म्हणून आमची जबाबदारी आहे. सरकारने हा गांभीर्याने विषय घेतला आहे, असे मत ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी व्यक्त केले.

मंत्री गिरीश महाजन सांगली जिल्ह्यातील कार्यक्रमास रवाना होण्यासाठी कऱ्हाड (जि.सातारा) येथील विमानतळावर आले होते. त्यादरम्यान ते बोलत होते. माजी आमदार सदाभाऊ खोत, गोपीचंद पडळकर, सत्यजित देशमुख, अतिरीक्त मुख्य कार्यकारी अधिकारी महादेव घुले, प्रांताधिकारी अतुल म्हेत्रे, पोलिस उपाधिक्षक अमोल ठाकुर, तहसीलदार विजय पवार, वरिष्ठ पोलिस निरीक्षक प्रदीप सुर्यवंशी, प्रभारी गटविकास अधिकारी विजय विभुते, भाजपचे कऱ्हाड शहराध्यक्ष एकनाथ बागडी, कऱ्हाड तालुकाध्यक्ष धनाजी पाटील आदींनी त्यांचे स्वागत केले.

सरकारी रुग्णालय मृत्यू शयेवर आहेत अशी जाहरी टीका सामना पेपर मधून खासदार संजय राऊत यांनी केली आहे. त्या प्रश्नावर मंत्री महाजन म्हणाले, संजय राऊत हे काहीही बोलत असतात. त्यांचा सामनाच सध्या व्हेंटिलेटरवर आहे. एका दिवसात रुग्णालयात 24-25 मृत्यू होणे ही चुकीची बाब आहे. त्यासाठी मी स्वतः व पालकमंत्री तेथे जाऊन आलो आहोत. वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ तेथे जाऊन आले आहेत.

रुग्णालयात विविध आजाराचे रुग्ण असतात. त्यामुळे मृत्यूचा आकडा हा कमी जास्त होत असतो. त्यामुळे राज्य मृत्यू शयेवर आहे असे म्हणणे चुकीचे आहे. घडलेली घटना ही सरकार म्हणून आमची जबाबदारी आहे सरकारने हा गांभीर्याने विषय घेतला आहे.

लोकसभा, विधानसभेचे उमेदवार पक्षश्रेष्ठीच ठरवतील

संभाव्य लोकसभा विधानसभेचे उमेदवारी कोणाला द्यायची हा पक्षश्रेष्ठींचा निर्णय असतो., असे सांगून मंत्री महाजन म्हणाले, सध्या अनेक वेगवेगळ्या लोकांची यांना खासदार करणार यांना आमदार करणार अशी नावे येत आहेत. मात्र त्याचा निर्णय पक्षश्रेष्ठीच घेतील. पक्षश्रेष्ठी जो आदेश देतील त्याप्रमाणे ते उमेदवार निवडणूक रिंगणात राहतील.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

युरोपात ३०-३५ डिग्री सेल्सिअसने हाहाकार, भारतात ४५वर पारा पोहोचूनही रस्ते वितळत नाहीत; कारण काय?

५ सामने, ३० चौकार, २९ षटकार अन् ३५५ धावा... Vaibhav Sooryavanshi ची इंग्लंडमधील कामगिरी भारताला विचार करायला लावणारी..

Small Savings Schemes: PPF आणि पोस्ट ऑफिस FD गुंतवणूकदारांसाठी मोठी बातमी! पुढील 3 महिन्यांसाठी व्याजदर जाहीर; पाहा नवे दर

Ramtirth Waterfall : पांढराशुभ्र फेस अन् खळखळणारा आवाज! आंबोलीतील प्रसिद्ध रामतीर्थ धबधबा प्रवाहित; पावसाच्या पाण्यामुळं खुललं सौंदर्य, पर्यटकांची गर्दी

Europe Heatwave: युरोपमध्ये उष्णतेचा कहर! रस्ते वितळले, लोखंडी ट्रॅक वाकले, हजारो नागरिक रुग्णालयात...भयानक व्हिडिओ व्हायरल

SCROLL FOR NEXT