सातारा

माणला पुन्हा पावसाने झोडपले; बाजरी, कांद्यासह पिकांचे नुकसान

रुपेश कदम

दहिवडी  (जि. सातारा) : माणच्या बहुतांशी भागात काही दिवसांपासून पावसाने दमदार हजेरी लावली होती. बुधवारी दुपारपासून पुन्हा जोरदार पावसाने माणला झोडपून काढले. या पावसाने शेतीला फायदा होण्यापेक्षा नुकसानच होण्याची शक्‍यता आहे. आंधळी धरणाच्या पाणीपातळीत झपाट्याने वाढ होऊ लागली आहे. 

यंदाच्या वर्षी पावसाळ्याच्या सुरुवातीला माणमध्ये दमदार पाऊस झाला नाही. मात्र, रिमझिम पाऊस सतत पडत होता. त्यामुळे वाटाण्याचे नुकसान झाले. मात्र, बाजरीसारखी पिके जोमदार आली. काही दिवसांपासून मात्र जोरदार पावसाने माणमध्ये हजेरी लावली. या पावसाने ओढे, नाले तर भरभरून वाहिलेच, तसेच माणगंगा नदीलाही पूर आला. बहुतांशी सिमेंट बंधारे, माती नालाबांध व तलाव भरून गेले. ही स्थिती सुखावह असली, तरी सतत पडत असलेल्या पावसाने शेतांमध्ये पाणी साठले आहे. शेतात राहिलेले मूग कुजले आहेत. 

बाजरी आडवी पडली असून, कणसे काळी पडण्याची भीती आहे. कांद्याचे मोठे नुकसान होण्याची शक्‍यता आहे. कांद्याची रोपे सडू लागली आहेत. पेरलेले कांदा बी उगवून येण्याची शक्‍यता दुरावत चालली आहे. उगवलेले नासण्याची शक्‍यता आहे. आजच्या तुफानी पावसाने पुन्हा एकदा बहुतांशी माणला झोडपून काढले. दहिवडी शहरासह परिसरात मुसळधार पाऊस झाला. नरवणे परिसरातही या पावसाने जोरदार हजेरी लावली. पश्‍चिम माणला या पावसाने चांगलाच तडाखा दिला. त्यामुळे माणगंगा नदीसह ओढ्या-नाल्यांना मोठा पूर आला. अनेक ठिकाणी शेतांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साठले आहे. 

संपादन : बाळकृष्ण मधाळे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ऐनवेळी पायलट का बदलले? मुंबईत CCTVमध्ये काय दिसलं? अजितदादांच्या अपघात प्रकरणी मुख्यमंत्र्यांनी सगळंच सांगितंल

Madha News : माढ्याचा आठवडा बाजार आता हायटेक आणि शिस्तबद्ध! कार्यकर्त्यांच्या 'फिल्डिंग'मुळे वाहतूक कोंडीला ब्रेक, महिला व वृद्धांकडून कौतुक

राज्य सरकारची मोठी घोषणा! २६ आणि २७ मार्चला रामनवमीनिमित्त सार्वजनिक सुट्टी जाहीर; पण कुणाला? जाणून घ्या...

Madha News : माढ्याचा पाण्याचा प्रश्न सुटणार! ५२ कोटींच्या पाणीपुरवठा योजनेसाठी नगराध्यक्षा मीनल साठे यांचे उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांना साकडे

कर्नाटकला अधिकारच नाही, ही तर महाराष्ट्राची मानहानी; अजित पवार अपघात प्रकरणी FIR वर मुख्यमंत्र्यांनी स्पष्टच सांगितलं

SCROLL FOR NEXT