सातारा

परतीच्या पावसाचा तडाखा! कवठ्यात शेतमाल भिजला; पाटणला शेतकरी दुहेरी संकटात

पुरुषाेत्तम डेरे/ जालिंदर सत्रे

कवठे (जि. सातारा) : कवठे परिसरात गेल्या दोन दिवसांपासून पडत असलेल्या पावसाने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे. परिसरात मेघगर्जनेसह पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. शेतकऱ्यांची सोयाबीन काढण्याची लगबग अंतिम टप्प्यात असून, शेतशिवारात सोयाबीन मळणीची कामे सुरू होती.
 
लवकर घेवडा, सोयाबीन तसेच कडधान्याची पिके काढलेल्या शेतकऱ्यांची रब्बी पिकासाठी पेरणीपूर्व मशागतीची कामासाठी धांदल सुरू होती. अचानकपणे आलेल्या पावसाने शेतीच्या कामात खोळंबा झाला आहे. अनेक शेतकऱ्यांची काढलेली पिके पावसाने शेतामध्येच भिजल्याने मोठे नुकसान झाले. हा पाऊस ज्वारी, गहू, हरभरा आदी रब्बी पिकांच्या पेरणीपूर्व मशागतीसाठी उपयुक्त असल्याने समाधानही व्यक्त होत आहे.

ऐन हंगामात शेतकरी विचारतात, कुठे गेला युरिया? 

खरीप पिकांच्या काढणीत व्यत्यय 

पाटण : तालुक्‍यात शनिवापासून सुरू झालेल्या पावसाने खरीप पिकांच्या काढणीत खंड पडला आहे. त्यामुळे शेतकरी हतबल झाला आहे. शनिवारी सायंकाळी परतीच्या पावसाने तालुक्‍याला झोडपून काढले होते. रात्री उशिरापर्यंत पाऊस पडत होता. पहाटेपासून पावसाचा जोर कमी झाला. कापणी केलेली व पावसामुळे शेतात भिजलेल्या पिकांची मळणी करण्यासाठी शेतकऱ्यांनी सुरुवात केली होती.

परतीच्या पावसाचा जावळीसह महाबळेश्वरला तडाखा; स्ट्रॉबेरी लागवडीवर परिणाम

मात्र, रविवारी दुपारी दीड वाजता पावसास सुरुवात झाली. हलक्‍या पावसाच्या सरी पडत होत्या. रात्री उशिरापर्यंत पाऊस पडत होता. पाऊस पूर्ण थांबल्याशिवाय शेतकरी पुन्हा पिकांची काढणी करणार नाही. पावसामुळे कापणी केलेली पिके शेतात व काढणीसाठी शेतकरी व्यस्त असल्याने उन्हात वाळविण्यासाठी घातलेले धान्य भिजले. खरिपाची काढणी करता येत नाही व ढगाळ वातावरणामुळे काढलेले धान्य वाळविता येत नाही, अशा दुहेरी संकटात शेतकरी सापडला आहे. 

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

राष्ट्रपतींच्या ADCला करता येत नाही लग्न, काय असतात अटी? कशी होते निवड? १ जागा, ३० जण शॉर्टलिस्ट, १४ दिवसांची मॅरेथॉन मुलाखत

भांडुपमध्ये पोलिसांची मोठी कारवाई! २० लाखांचा गुटखा पानमसाला जप्त, नऊ आरोपींना अटक; पाच वाहने जप्त

Marathi News Live Updates : इंद्रायणी नदीच्या प्रदूषणाने हजारो माशांचा मृत्यू; भाविक, ग्रामस्थ आणि शेतीच्या आरोग्यावर गंभीर संकट

Indian Railway: तिकीट बुक न झालेल्यांसाठी गुडन्यूज! कोकणात 4 अनारक्षित रेल्वे सोडण्याचा निर्णय, मध्य रेल्वेची घोषणा

Baramati News: महिलेसोबतचे प्रेमसंबंध पतीला समजले, बारामतीत १९ वर्षीय तरुणाने गोळी झाडून घेत आयुष्य संपवलं

SCROLL FOR NEXT