सातारा

परतीच्या पावसाचा जावळीसह महाबळेश्वरला तडाखा; स्ट्रॉबेरी लागवडीवर परिणाम

रविकांत बेलोशे

भिलार (जि. सातारा)  : गेल्या दाेन दिवसांत पावसाने सातारा शहरासह जिल्हाभरात चांगलाच जोर धरला आहे. जिल्ह्यात रविवारी सकाळी आठ वाजेपर्यंत एकूण सरासरी 32.66 मिलिमीटर परतीच्या पावसाची नोंद झाली आहे. सलग दोन दिवस झालेल्या पावसामुळे जिल्ह्यातील बहुतांश तालुक्‍यांतील खरीप हंगामातील पिकांची काढणी रखडली असून, काही ठिकाणी काढलेली पिके पाण्याखाली गेल्याने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. 

जावळी व महाबळेश्वर तालुक्‍यांतील काढणीला आलेल्या खरीप पिकांच्या मुळावर पाऊस उठला असून आगोदरच मेटाकुटीला आलेल्या शेतकऱ्यांच्या आर्थिक आशा धुळीला मिळणार की काय, या विचाराने शेतकरी चिंताग्रस्त झाले आहेत. शेतकऱ्यांनी भुईमूग, सोयाबीन पिकाची काढणी जोमात सुरू केली. दोन दिवसांपासून पावसाने पुन्हा हजेरी लावल्याने शेतकरी आणखी गर्तेत सापडले आहेत.

जिल्हाधिकारी शेखर सिंहंच्या प्रयत्नांना ठाकरे सरकारचे पाठबळ

केळघर, इंदवली, हातगेघर, दापवडी, काटवली, बेलोशी परिसरात भातपीक घेतले जाते. जोराचा पाऊस आणि वाऱ्याने भातपीक भुईसपाट झाले आहे. त्यामुळे उत्पन्नावर परिणाम होणार आहे. हा पाऊस असाच काही दिवस राहिल्यास इतर पिकांवरही परिणाम होणार आहे. भिलार, दानवली, भोसे, राजपुरी परिसरात स्ट्रॉबेरी लागवड सुरू असून पावसाने लागवडीवर परिणाम होत आहे, तर काही ठिकाणी पाणी साचले आहे.

कोयना धरणाचे जगभरातील शास्त्रज्ञांना आव्हान! 

केळघर : परिसरात पडलेल्या पावसाने भातशेतीचे नुकसान झाले आहे. काढणीस आलेले भातपीक पावसाने आडवे झाले असून भाताचे उत्पन्न घटण्याची भीती व्यक्त होत आहे. जावळी तालुक्‍यातील रेंगडीसह परिसरात भातशेतीचे मोठे नुकसान झाले आहे. शनिवारच्या तुलनेत रविवारी पावसाने दुपारपर्यंत विश्रांती घेतली होती. दिवसभर ढगाळ वातावरण होते. 

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Cricketer Died: संघाला जिंकवलं, मात्र जीव गमावला! शेवटचा चेंडू टाकल्यानंतर गोलंदाज अचानक मैदानात कोसळला अन्...

Thane News: एकनाथ शिंदे यांच्या होमपीचवर मनसे-ठाकरे गटाचे आंदोलन; ठाण्यातील कोंडी, भ्रष्टाचाराविरोधात मोर्चा

US China Relations: आम्हीही ठोस पावले उचलू; ‘१०० टक्के आयातशुल्क’प्रकरणी चीनचे अमेरिकेला प्रत्युत्तर

Navi Mumbai: भुरट्या चोरांवर पोलिसांची नजर! दिवाळीनिमित्त शहरात विशेष पथके तैनात

Ready-To-Wear Sarees : दिवाळीसाठी साड्यांची मोठी मागणी! 'रेडी टू वेअर' साड्यांनी केली तरुणींची सोय

SCROLL FOR NEXT