सातारा

सातारकरांनाे सावधान! आवश्यकता असल्यास घराबाहेर पडा

सिद्धार्थ लाटकर

सातारा : भारतीय हवामान खात्याने राज्यात येत्या 17 ऑक्टोबर पर्यंत वीजेच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे. विशेषत: किनारपट्टीलगतच्या सर्व जिल्ह्यामध्ये वीजेच्या कडकडाटासह मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तविण्यात आलेली आहे. या कालावधीमध्ये सर्व प्रशासकीय यंत्रणांनी मनुष्य हानी टाळण्यासाठी सतर्कतेचा बाळगावा, असे राज्य शासनाचे कक्ष अधिकारी हितेंद्र दुफारे यांनी कळविले आहे.

दरम्यान सातारा जिल्ह्यातही वीजेच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस हाेण्याची शक्यता असल्याने जिल्हा नियंत्रण कक्ष जिल्हाधिकारी कार्यालयाच्या माध्यमातून नदी काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. नागरिकांनी पाऊस पडताना विजा चमकत असल्यास झाडाखाली उभे राहू नका व मोबाईलचा वापर करू नका असेही कळविण्यात आले आहे. 

लोकहो सावधान, कारण सिंधुदुर्गात आज तर रायगडमध्ये उद्या रेड अलर्ट

याबराेबरच पाण्यात असाल तर त्वरित पाण्याबाहेर पडा. मुसळधार पावसात आवश्यकता नसल्यास घराबाहेर पडू नका. जुन्या मोडकळीस आलेल्या घरात, इमारतीत आश्रय घेऊ नका. नदी नाल्याच्या पुलावरून पाणी वाहत असल्यास पूल ओलांडू नका. अफवांवर विश्वास ठेवू नका व अफवा पसरवू नका असे आवाहन करण्यात आले आहे.

कोयना धरणाचे कार्यकारी अभियंतापद आजही रिक्तच 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shubman Gill: भारताच्या सर्वात मोठ्या विजयासह कर्णधार गिलने मोडला गावसकरांचा ४९ वर्षांपूर्वीचा विक्रम अन् घडवला नवा इतिहास

ENG vs IND: आकाश दीपने १० विकेट्ससह विक्रम कामगिरी बहिणीला केली समर्पित! कारणही आहे खूपच भावूक

CA Result: ‘सीए’च्या अंतिम परीक्षेत छत्रपती संभाजीनगरचा राजन काबरा देशात प्रथम; १४ हजार २४७ उमेदवार पात्र ठरले

WTC Points Table: टीम इंडियाने इंग्लंडविरुद्ध दुसऱ्या कसोटीतील विजयासह उघडलं गुणांचं खातं! जाणून घ्या टीम कोणत्या क्रमांकावर

Pune Viral Video: इंजिनिअरिंगमध्ये 3 वेळा नापास, तरुणाची पुण्यातील राजाराम पुलावरून नदीपात्रात उडी, व्हिडिओ व्हायरल

SCROLL FOR NEXT