कोयनामाईचा बामणोलीतील घरांना स्पर्श; धरणाची 'सेंच्युरी' sakalnews
सातारा

कोयनामाईचा बामणोलीतील घरांना स्पर्श; धरणाची 'सेंच्युरी'

महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी म्हणून ओळख असलेल्या कोयना धरण परिसरात गेल्या चार दिवसापासून सातत्याने मोठा पाऊस होत आहे

सुर्यकांत पवार

कास : चार दिवसांपासून होत असलेल्या अतिवृष्टीमुळे कोयना धरण शंभर टक्के भरले असून कोयनामाईने पर्यटन स्थळ असलेल्या बामणोली तील घरांना स्पर्श केला आहे. महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी म्हणून ओळख असलेल्या कोयना धरण परिसरात गेल्या चार दिवसापासून सातत्याने मोठा पाऊस होत आहे. या पावसामुळे 22 जुलै च्या अतिवृष्टी मध्ये भरलेले कोयना धरण अगोदरच ओव्हरफ्लो झाले आहे. त्यातच पावसाची संततधार सुरू असल्याने 105 टीएमसी क्षमता असलेले हे धरण शंभर टक्के भरले आहे.

कोयना धरणाच्या भिंती पासून ते तापोळा पर्यंत शंभर किलोमीटरचा परिसर व्यापलेला हे धरण पूर्ण क्षमतेने भरल्यामुळे वर्षभराची वीज निर्मिती, पिण्याच्या पाण्याची सिंचनाची, चिंता मिटली आहे. कोयना धरणात महाबळेश्वर पासून ते कांदाटी खोऱ्यातील दुर्गम भागा मधून पाण्याचा मोठा प्रवाह येत असतो. कोयना धरणाच्या भिंतीपर्यंत पसरलेला हा सर्व भाग सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाच्या राखीव क्षेत्रात येत आहे त्यामुळे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात जंगल आहे. भारतातील सर्वात जास्त पाऊस पडणारे ठिकाण कांदाटी खोऱ्यातील लामज गाव याच विभागात येते त्यामुळे सातत्याने या ठिकाणी प्रचंड पाऊस होत असतो त्यामुळे कोयना धरण परिसर हा पावसाचे आगार मानला जातो. बामणोली हे क वर्ग दर्जा पर्यटन स्थळ असून या ठिकाणी सातत्याने पर्यटकांची वर्दळ असते.

सह्याद्रीच्या व्याघ्र प्रकल्पातील राखीव क्षेत्रातील वासोटा किल्ला हा ट्रेकिंगसाठी प्रसिद्ध आहे या ठिकाणी जाण्यासाठी बामनोली मधून बोट पकडावी लागते. त्यामुळे वर्षभर या ठिकाणी बोटिंग व ट्रेकिंगसाठी गर्दी असते कोयना धरणाची पाणी बामनोली गावातील घरांना लागले असून बोट क्लब चे जुने ऑफिस पाण्याखाली गेले आहे. या ठिकाणी पाण्याच्या लाटा घरांना धडकत दरवर्षी धरण भरल्यानंतर दरवर्षी कोयना माई बामणोली गावाला स्पर्श करते. फोटो - बामणोली - कोयना धरण शंभर टक्के भरल्याने पाणी बामणोली गावाला लागले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मुंबईत CNG महागला, महानगर गॅसने पुन्हा दरात केली वाढ; जाणून घ्या किती आहे दर?

Gold Silver Price : सोन्या-चांदीच्या दरात आठवडाभरात मोठी घसरण; सोनं ५ हजार तर चांदी ३० हजारांनी घसरली

Madhya Pradesh Foundation Day: मध्य प्रदेशचा ७१ वा स्थापना दिन; ‘वारशाचा गौरव, विकासाची नवी झेप’ हीच राज्याची नवी ओळख : मुख्यमंत्री

PAK vs SL Final: एका सामन्यात ६५६ धावा अन् १० विक्रमांचा धुरळा! भारताचा २४ वर्षांपूर्वीचा विश्वविक्रम मोडला; नेमकं काय घडलं?

Ujani Project: पुणे-सोलापूर मार्गावर ‘रास्ता रोको’; उजनी परिसरातील प्रस्तावित एआय डेटा सेंटरला विरोध

SCROLL FOR NEXT