Heavy Rain
Heavy Rain esakal
सातारा

ढेबेवाडीत सलग दुसऱ्या दिवशी विजांच्या कडकडाटासह धुवांधार; घरांवरील उडाली छप्परे

राजेश पाटील

ढेबेवाडी (सातारा) : परिसरात आज सलग दुसऱ्याही दिवशी विजांच्या कडकडाटासह झालेल्या वादळी पावसाने (Heavy Rain) ठिकठिकाणी नुकसानीच्या घटना घडल्या. काही ठिकाणी घरांची छप्परे उडाली, विजेचे खांब कोलमडले, झाडे मोडून पडली असून, पावसामुळे नदी, ओढे दुथडी भरून वाहत आहेत. (Heavy Rain In Dhebewadi Area Satara News)

आज सायंकाळी विजांच्या कडकडाटात जोरदार पावसाला सुरुवात झाली. तासभर पावसाचा जोर टिकून होता. पाचुपतेवाडी जवळच्या जाधववाडीतील सुरेश जाधव यांच्या घरावरील छप्पर वादळाने उडाल्याने आतील प्रापंचिक साहित्य व धान्य भिजून नुकसान झाले. पत्रा अंगावर पडल्याने श्री. जाधव यांना किरकोळ दुखापत झाल्याचे सरपंच आत्माराम पाचुपते यांनी सांगितले.

ते म्हणाले, "तेथील मंदिरावरीलही छप्पर उडाले असून, विजेचे खांब कोलमडून तर झाडे मोडून पडली आहेत. पावसामुळे वांग नदीसह ओढे, नाली भरून वाहत आहेत. पवारवाडी जवळच्या नदीवर पुलाचे बांधकाम सुरू असल्याने नदीतून तयार केलेला पर्यायी मार्ग पाण्याखाली गेल्याने निवी, कसनीसह अनेक दुर्गम गावे व वाड्यावस्त्यांचा दळणवळण संपर्क विस्कळित झाला होता. पावसाने खंडित झालेला परिसरातील वीजपुरवठा रात्री उशिरापर्यंत सुरळीत झालेला नव्हता.

Heavy Rain In Dhebewadi Area Satara News

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Uma Ramanan: तामिळ चित्रपटसृष्टीचा आवाज हरपला, दिग्गज गायिकेचे निधन

Prajwal Revanna: 'सेक्स टेप' प्रकरणी प्रज्वल रेवण्णा यांच्याविरोधात ग्लोबल लूकआऊट नोटीस जारी

PM Narendra Modi : 'मोदींचे निधन झाले तर कोणी पंतप्रधानच होणार नाही का?' काँग्रेस आमदाराचे पुन्हा वादग्रस्त विधान

Mumbai Loksabha: कोण मारणार मुंबईत बाजी? ठाकरेंचा आत्मविश्वास 'सातवे आस्मान'पे, भाजप मात्र संभ्रमात

Latest Marathi News Live Update : अमेठीतून राहुल गांधी उद्या भरणार अर्ज? सूत्रांची माहिती

SCROLL FOR NEXT