Rain Pimpode Rain Pimpode
सातारा

कोरेगाव तालुक्‍यात काश्मीरची झलक; पिंपोडेसह वाठारला गारांचा खच

कोरोनामुळे लॉकडाउन आणि गारपिटीमुळे शेतकरी दुहेरी संकटात सापडला आहे.

बाळकृष्ण मधाळे

पिंपोडे बुद्रुक (जि. सातारा) : कोरेगाव तालुक्‍याच्या उत्तर भागात आज अर्धा तास जोरदार पाऊस झाला. पावसापूर्वी झालेल्या गारपिटीने पिंपोडे ते वाठार दरम्यान पिकांचे मोठे नुकसान झाले. सर्व शेत व रस्त्यावर गारांचा खच पडला होता. गारपीट इतकी जोरदार होती, की झाडांना व पिकांना पानेही उरली नाहीत. सर्व पिके बोडकी झाली. त्यामुळे कलिंगड, ऊस व तरकारी पिकांचे प्रचंड नुकसान झाले.

कोरोनामुळे लॉकडाउन आणि गारपिटीमुळे शेतकरी दुहेरी संकटात सापडला आहे. लॉकडाउनमुळे सध्या अनेकांचे व्यवसाय बंद आहेत. त्यामुळे बहुतांश जणांनी शेतीत लक्ष घातले आहे. उन्हाळ्यात हंगामी पिके करून चार पैसे मिळवण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड सुरू आहे. मात्र, या पावसाने त्यांच्या आकांक्षावर पाणी फिरवले आहे. गेल्या चार दिवसांपासून वातावरणात उष्मा वाढला होता. दुपारनंतर आकाशात ढगांची गर्दी व्हायची. मात्र, पाऊस हुलकावणी देत होता. आज दुपारी एक वाजता आभाळ ढगांनी दाटून आले.

चहूकडे काळवंडलेले ढग, विजांचा कडकडाट आणि जोरदार वाऱ्यामुळे जणू सायंकाळ झाल्यासारखे वातावरण तयार झाले. अचानक गारांचा पाऊस सुरू झाला. जोरदार पाऊस आणि अधूनमधून पडणाऱ्या गारा अशा पहिल्या उन्हाळी पावसात भिजण्याचा मोह अनेकांना आवरता आला नाही. पावसाने वातावरणात गारवा निर्माण झाला. पिंपोड्यासह वाठार स्टेशन, सोनके, नांदवळ, अनपटवाडी, दहिगाव परिसरात सुमारे पाऊणतास पडलेल्या पावसाने उकाड्यापासून वैतागलेल्या नागरिकांना दिलासा मिळाला. मात्र, कलिंगड, गोट कांदा, द्राक्ष, आंबा, तसेच फळ उत्पादकांचे मोठे नुकसान झाले.

कोरोनामुळे व्यवसाय ठप्प आहे. मोठे भांडवल गुंतवून कलिंगड लावले होते. बाग सुरू होणार असतानाच आजच्या गारपिटीने वेलांना पानही उरले नाही. कलिंगडाला डाग पडणार असल्याने त्याला ग्राहक मिळणार नाहीत. त्यामुळे आमचे दीड लाखाचे नुकसान झाले आहे.

-चंद्रकात खराडे, शेतकरी पिंपोडे बुद्रुक

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पुणे, मुंबई अन् नागपूरनंतर आता कोल्हापूरमध्येही होणार आंतरराष्ट्रीय Cricket Stadium; राज्य मंत्रिमंडळाकडून प्रस्तावाला मंजूरी

पटसंख्येची अट शिथिल करा! शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे समायोजन थांबवा, मुख्याध्यापक संघाची शिक्षणमंत्र्यांकडे मागणी, शिक्षणमंत्री काय म्हणाले? वाचा...

Promise Day 2026: प्रॉमिस डेनिमित्त काहीतरी खास हवंय? ‘हे’ वचन दिलंत तर नात्यात येईल नवी गोडी

Bangladesh Hindu Killing : बांगलादेशात निवडणुकीपूर्वी आणखी एका हिंदूची हत्या! ; व्यावसायिकाला दुकानात कोंडून मारले

T20 World Cup: भारतीय खेळाडू Bat Tempering करण्याचा दावा करणाऱ्या क्रिकेटपटूचा यू-टर्न; म्हणाला, 'मला तर असं काही....'

SCROLL FOR NEXT