सातारा

पावसाने तारले... अन्‌ पावसानेच मारले, राणंदच्या शेतकऱ्यांची व्यथा

विशाल गुंजवटे

बिजवडी (जि.सातारा) : माण तालुक्‍यातील पूर्व, उत्तर भागात पाऊस थांबायच नाव घेत नसल्याने खरीप हंगामातील पिके व फळबागांचे मोठे नुकसान होऊ लागले आहे. त्यामुळे पावसाने तारले... अन्‌ पावसानेच मारले अशी स्थिती राणंद, बिजवडी परिसरात झाली आहे. प्रशासनाने नुकसानग्रस्त भागातील पिकांची पाहणी करून पंचनामे करून शेतकऱ्यांना भरपाई द्यावी, अशी मागणी केली जात आहे.
युवकांना पाेलिसांचा दणका
 
तालुक्‍याच्या पूर्व व उत्तर भागात पावसाने पिकांत पाणी साचून मोठे नुकसान झाले आहे. खरिपातील पिके पिवळी पडली असून, फळबागांनाही रोगराईचे निमंत्रण मिळत आहे. राणंद परिसरात गेले 15 दिवस सतत पडणाऱ्या पावसामुळे खरिपातील बाजरी, मूग, घेवडा, कांदा, तसेच उसाचे मोठे नुकसान झाले आहे. राणंद व परिसरातील गावांत दमदार पावसामुळे पिके चांगली आली होती. मात्र, तो पाऊस थांबायचे नावच घेत नाही. त्यामुळे पिके खराब होऊ लागली आहेत. बिजवडी परिसरातही दमदार पावसामुळे ओढनाले, बंधारे, तलाव भरून वाहत आहेत.

पांडवकालीन मेरुलिंग; मंदिराच्या गाभाऱ्यात उमटताे तुमचा प्रतिध्वनी

गेल्या वर्षी चांगल्या पावसामुळे पाणी पातळी टिकून राहिल्याने उन्हाळ्यात फळबाग लागवडधारक शेतकऱ्यांनी बागांचे बहार धरले. मात्र, जून महिन्यापासून पडत असलेल्या सततच्या पावसामुळे फळबागांचेही मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे नुकसानग्रस्त पिके व फळबागांचे पंचनामे करण्याची मागणी आहे. 


राणंद परिसरात बाजरी, मूग, घेवडा, कांदा, तसेच उसाच्या शेतातून पाणी निघत नसल्याने पिके खराब होऊ लागली आहेत. त्यामुळे खरीप हंगाम वाया जाणार आहे. प्रशासनाने या पिकांची पाहणी करून पंचनामे करण्याचे आदेश द्यावेत. 
- बाळासाहेब शिंदे, कार्याध्यक्ष, तालुका राष्ट्रवादी कॉंग्रेस 

संपादन - संजय शिंदे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MSP hike 2026: मोदी सरकारचा शेतकऱ्यांसाठी मास्टरस्ट्रोक! १४ खरीप पिकांच्या MSP मध्ये वाढ, कापूस-सूर्यफूल उत्पादकांना मोठा फायदा!

IPL 2026 : चेन्नईच्या ताफ्यात दाखल झालेला Macneil Hadley Noronha कोण? UAEत बालपण; DC, KKR, MI साठी दिलेलं ट्रायल...

Mumbai: मुंबईकरांच्या स्वयंपाकघरावर महागाईचा तडाखा! भाजीपाल्याचे भाव वाढले; जाणून घ्या सध्याचे दर...

Latest Marathi News Live Update : तिरुवनंतपुरम जिल्हा क्रीडा परिषदेच्या कार्यालयात एसीचा स्फोट, २ जखमी

SC on Hinduism: श्रद्धा सिद्ध करण्यासाठी मंदिरात जाण्याची गरज नाही, हिंदू धर्माबद्दल सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वाचे निरीक्षण

SCROLL FOR NEXT