Heavy rains in Mayani wall collapsed Four people injured Satara sakal
सातारा

सातारा : मायणीत जोरदार पाऊस; भिंत कोसळून चार जण जखमी

वादळी वारा व पावसामुळे येथील बाजार पटांगण शेजारी खाजगी मालकाच्या बंद घराची भिंत कोसळून पाच-चार जण जखमी झाले आहेत.

संजय जगताप - सकाळ वृत्तसेवा, अंकुश चव्हाण

मायणी : वादळी वारा व पावसामुळे येथील बाजार पटांगण शेजारी खाजगी मालकाच्या बंद घराची भिंत कोसळून पाच-चार जण जखमी झाले आहेत. सर्व जखमींना उपचारासाठी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान वादळी वाऱ्याने मायणी विटा मार्गावरील माने वस्तीलगत बाभळीचे मोठे झाड रस्त्यावर उन्मळून पडले आहे. त्यामुळे सुमारे एक तासापासून दोन्ही बाजूकडील संपूर्ण वाहतूक बंद झाली आहे. परिणामी एक किलोमीटर पर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या आहेत. तसेच, मायणी बसस्थानक परिसरातील एक मोठा वृक्ष वादळी वाऱ्यामुळे उन्मळून पडला असून त्याखाली अनेक दुचाकी सापडल्याचा अंदाज व्यक्त होत आहे.

मायणी तालुका खटाव येथे आज झालेल्या वादळी पावसामुळे बाजार पटांगणावर भिंत कोसळून सहा जण गंभीर जखमी झाले तर परिसरात वृक्ष उन्मळून पडल्याने दुचाकी वाहने पानटपऱ्या त्यांचे मोठे नुकसान झाले. दरम्यान या घटनेत जखमी झालेल्यांना कराड सातारा येथे उपचारासाठी दाखल केले आहे

जखमी झालेल्यांची नावे

सुजाता पिलाजी दगडे राहणार मायनी , कल्पना सोमनाथ लुकडे, रा. मायणी, संगिता संजय मोरे, रा. निमसोड, इंदुबाई तानाजी निकम राहणार गुंडेवाडी, आशाताई भगवान भोसले राहणार- वरकुटे म्हसवड, भगवान पांडुरंग भोसले रा. वरकुटे म्हसवड

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT