सातारा

आंधळी धरण तुडुंब; बिदाल, दहिवडीकरांना मोठा दिलासा

रुपेश कदम

दहिवडी (जि. सातारा) : माणमधील सर्वच तलाव भरून वाहत असताना आंधळी धरणही सोमवारी सायंकाळी झालेल्या मुसळधार पावसानंतर रात्रीच्या सुमारास धरणाच्या सांडव्यावरून पाणी ओसंडून वाहू लागले. त्यामुळे माणवासीयांच्या आनंदाला उधाण आले. तालुक्‍याची जीवनवाहिनी म्हणून माणगंगा नदीकडे पाहिले जाते. या वर्षी पावसाळ्याच्या सुरवातीस म्हसवड परिसरात माणगंगा वाहू लागली होती. सप्टेंबर महिन्यात उगमाच्या ठिकाणी नदी वाहण्यास सुरुवात झाली. बहुतांशी पाणीसाठे भरून वाहत होते. मात्र, आंधळी धरण न भरल्याने धरणापासून खाली गोंदवलेपर्यंत माणगंगा नदी वाहत नव्हती. त्यामुळे आंधळी धरण कधी भरते, याकडे माणवासीयांचे लक्ष लागून राहिले होते. 

सोमवारी सायंकाळी मुसळधार पाऊस झाल्याने नदी, नाले, ओढे यांना मोठा पूर आला. रात्रीच्या सुमारास धरण पूर्णक्षमतेने भरून पाणी सांडव्यावरून ओसंडून वाहू लागले. हे पाणी पुढे बिदाल, दहिवडीच्या दिशेने झेपावले. त्यामुळे नदीकाठच्या तसेच लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांत समाधानाचे वातावरण पसरले. विशेषतः बिदाल व दहिवडीकरांसाठी आंधळी धरण भरणे महत्त्वाचे असते. दोन्ही गावांसाठीच्या पिण्याच्या पाणी योजना या धरणाच्या पाण्यावरच अवलंबून आहेत. धरणातून शेतीसाठी साधारण पाच ते दहा किलोमीटर पाइपलाइन नेण्यात आल्या आहेत. 

धरण भरल्यामुळे शेतकरी, ग्रामस्थ यांच्यासोबत प्रशासनाने सुटकेचा नि:श्वास सोडला. सांडव्यावरून पाणी वाहू लागल्यानंतर खालील भागात माणगंगेला पूर आला. बिदाल, दहिवडी येथील नदीवरील काही पूल पाण्याखाली गेले. पाणी पाहण्यासाठी ग्रामस्थांनी धरणाकडे तसेच नदीकडे धाव घेतली. गेल्या वर्षी 21 ऑक्‍टोबर रोजी दहा वर्षांनंतर आंधळी धरण भरले होते. या वर्षी मुसळधार पावसामुळे बरोबर एक महिना अगोदरच म्हणजे 20 सप्टेंबर रोजी धरण भरल्यामुळे माणवासीयांच्या आनंदाला उधाण आले. लाभधारक शेतकऱ्यांत समाधान पसरले आहे.

संपादन : बाळकृष्ण मधाळे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tata Chairman Salary: Tata Sons च्या चेअरमनला किती पगार मिळतो? नोएल टाटांच्या विरोधानंतर पद पुन्हा चर्चेत; आकडा पाहून धक्का बसेल!

Akola News : जिल्हाधिकाऱ्यांनी सोडले शेतकऱ्यांना वाऱ्यावर; महाबीज प्रशासनाकडून माहिती देण्यास नकार, एमडींनीही केले हात वर

Ai+ Nova 2 Power 5G भारतात लाँच! 16,999 रुपयांत खरेदीची संधी...पाहा फीचर्स अन् ऑफर्स!

Katraj Kondhwa Road Issue : आयुक्तांचे आश्वासन विरणार हवेत! कात्रज कोंढवा रस्ता; उर्वरित १० मिळकतींमुळे रस्ता रुंदीकरण रखडणार

Farmer Agitation : शेतकरी संकटात, सरकार कुठंय? लोहाऱ्यात हजारो शेतकऱ्यांचा आक्रोश; आमदारांना बोलण्यास मनाई करत शेतकऱ्यांनी सोयाबीन उधळले

SCROLL FOR NEXT