सातारा

पाऊस आला धावून, रस्ता गेला वाहून!

केराप्पा काळेल

कुकुडवाड (जि. सातारा) : वरकुटे-मलवडी परिसरात गेल्या पंधरवड्यात ढगफुटीसदृश परतीचा पाऊस होऊन ओढ्याला आलेल्या पुराने पोळवस्ती बंधाऱ्यासमोरच्या पुलावरून खरातवाडीसह फडतरेवस्ती, इनामदारवस्तीकडे जाणारा मुख्य रस्ताच वाहून गेला असून, परिसरातील शेतीतील पिकांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळे खरातवाडी, पोळवस्ती, फडतरेवस्ती, इनामदारवस्तीवर राहणाऱ्या नागरिकांचा गावाकडे ये-जा करण्याचा संपर्क तुटला आहे. 

वरकुटे-मलवडी परिसरात धुवाधार झालेल्या पावसाने बाजरी, ऊस, मका या पिकांसह तरकारी भाजीपाल्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. ओढ्याकाठच्या परिसरातील शेतीचे बांधाखालील माती मोठ्या प्रमाणात वाहून गेल्याने त्याजागची जमीन खचली आहे. वरकुटे-मलवडी ते खरातवाडी रस्त्यावरील ओढ्याला मोठ्या प्रमाणात आलेल्या पुरात पोळवस्ती जवळचा पूल वाहून गेला आहे. ग्रामपंचायत अंतर्गत असणाऱ्या या पुलाचे कच्चे बांधकाम गेल्या वर्षांपूर्वीच करण्यात आले होते. 

कृषी विभागाच्या वतीने या ओढ्यावर बांधण्यात आलेल्या साखळी बंधाऱ्यातील पाणी पुलाच्या वरपर्यंत साठून राहत होते. त्यातच मोठ्या प्रमाणात आलेल्या पुराच्या पाण्याने हा पूल वाहून गेल्याने खरातवाडी परिसरात वास्तव्यास असणाऱ्या नागरिकांची गैरसोय झाली आहे. संबंधित वाड्या-वस्त्यांवरील लोकांना गावात येण्यासाठी लांबून वळसा मारून गावात यावे लागत आहे. यामुळे वेळ, श्रम व इंधनावरील खर्च वाढत असल्याने स्थानिक रहिवाशांना या नाहक त्रासास सामोरे जावे लागत आहे. या ठिकाणी असणारा पूल हा कच्चा न करता सिमेंटमध्ये पक्का करण्यात यावा, अशी मागणी ग्रामस्थांसह बाबाराजे हुलगे यांनी केली आहे.

संपादन : बाळकृष्ण मधाळे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

आधी लग्न करतो म्हणाला, संबंध ठेवल्यानंतर नकार दिला; तीन वेळा अत्याचाराचे आरोप, नांदेडमध्ये भोंदू महाराजाला अटक

'अशोकमुळे ती लिंबू कलरची साडी फेमस झाली' अशी ही बनवाबनवी सिनेमाबद्दल बोलताना अश्विनी भावे म्हणाल्या...'सचिनचं ते स्त्री पात्र...'

Chhatrapati Sambhajinagar: सिंगल कनेक्शनलाही १० दिवस वेटिंग; एजन्सींवर पोलिस बंदोबस्त.

शेलार मामा फाऊंडेशनच्या वतीने चैत्र नवरात्रोत्सवाचा जागर ; या कलाकारांनी लावली हजेरी

Virat Kohli Fact Check: तीन दिवसाच्या अंतरात लंडनला चार्टर्ड फ्लाईटने फेरी... विराटने खरंच RCB कडे मागणी? स्वत: च पोस्ट करत केला खुलासा

SCROLL FOR NEXT