सातारा

कोरोना उपचारासाठी कागदपत्रे बरोबर ठेवा, 'हे' आरोग्यमित्र तुम्हाला करतील मदत

प्रवीण जाधव

सातारा : कोरोना संसर्गावरील उपचार करण्यासाठी शासनाने नेमून दिलेल्या खासगी रुग्णालयांत उपचारासाठी जाताना कागदपत्रे बरोबर नेली जात नसल्यामुळे रुग्णांच्या उपचारांचा "क्‍लेम' करण्यात अडचणी निर्माण होत आहेत. त्यासाठी महात्मा फुले जनआरोग्य योजनेचा लाभ मिळविण्यासाठी रुग्णांनी आवश्‍यक कागदपत्रे सोबत नेणे आवश्‍यक आहे.
कोरोनाचा हॉरर शो

केशरी रेशन कार्डधारकांसाठी शासकीय किंवा खासगी दवाखान्यांमध्ये केल्या जाणाऱ्या उपचारांसाठी शासनाची महात्मा फुले जनआरोग्य योजना कार्यान्वित आहे. या योजनेमध्ये विविध प्रकारच्या 996 आजारांवर प्रतिकुटुंब प्रतिवर्ष दीड लाख रुपयांपर्यंत तसेच मूत्रपिंड प्रत्यारोपणासाठी अडीच लाख रुपयांपर्यंतची मदत मिळते. लाभार्थी कुटुंबातील एक किंवा अनेक व्यक्तींना या योजनेचा लाभ घेता येतो. सध्या कोरोना संसर्गाची बाधा देशासह राज्यात मोठ्या प्रमाणात झाली आहे. त्यामुळे शासनाने कोरोना संसर्गावरील उपचारही या योजनेच्या कक्षात आणले आहेत. शासनाने कोरोना उपचारासाठी नेमून दिलेल्या खासगी रुग्णालयांमध्ये उपचारासाठी गेलेल्या नागरिकाला ही सुविधा मिळते.

माणदेशीने अडवले 925 टीसीएम पाणी, आठ वर्षांत 17 सिमेंट बंधाऱ्यांची उभारणी
 
जिल्ह्यामध्ये महात्मा फुले जनआरोग्य योजनेमध्ये एकूण 27 रुग्णालयांची नोंदणी आहे. त्यामधील सध्या नऊ रुग्णालये ही कोरोना आणि नॉन कोरोना आजारांसाठी स्वतंत्रपणे उपचार देण्यासाठी निवडण्यात आली आहेत. कोरोना रुग्णांसाठी ही योजना केशरी शिधापत्रिकाधारकांसाठी मर्यादित न ठेवता शासनाने पिवळी, अंत्योदय, केशरी तसेच शुभ्र शिधापत्रिकाधारकांनाही या रुग्णालयांमध्ये मोफत उपचाराची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यामध्ये प्रयोगशाळा, इमॅजिंग तपासण्या, आंतररुग्ण सेवा, रक्तघटक कन्झ्युमेबल, डिस्पोजेबल, शस्त्रक्रिया, गृहशुल्क, आहार, परतीचा प्रवास इत्यादी सुविधांचा समावेश आहे. जिल्ह्यामध्ये आत्तापर्यंत 1600 रुग्णांनी या रुग्णालयांमध्ये उपचार घेतले आहेत.

अपंगत्वावर केली मात, त्या कर्तबगाराला उदयनराजेंची साथ!
 
या मोफत उपचार योजनेचा लाभ मिळण्यासाठी संबंधित रुग्णाची शिधापत्रिका किंवा तहसीलदारांचा रहिवासी दाखला यापैकी एक तसेच अधारकार्ड सोबत असणे आवश्‍यक आहे. कोरोना बाधा झाल्याचे स्पष्ट होण्यापूर्वी संबंधित रुग्णाचा स्वॅब घेतला जातो. अहवाल येईपर्यंत तो रुग्ण कोरोना केअर सेंटरमध्ये असतो. त्या वेळी बहुतांश रुग्ण हे वरील कागदपत्रे सोबत आणत नसल्याचे आत्तापर्यंत समोर आले आहे. बाधा झाल्याचे स्पष्ट झाल्यानंतर त्याला रुग्णालयात दाखल करून घेतले जाते तसेच घरातील व्यक्तींनाही क्वारंटाइन केले जाते. त्यामुळे संबंधित रुग्णाला उपचार कालावधीत वरील कागदपत्रे देणे शक्‍य होत नाही. परिणामी उपचाराची पूर्वपरवानगी मिळवून त्याला तातडीने योजनेच्या लाभात समाविष्ट करता येत नाही. त्यामुळे काही वेळा रुग्णांना लाभ मिळवून देण्यात अडचणी निर्माण होत आहेत. 

चौपदरीकरणाच्या कामात गावांच्या नावाच बारस

आरोग्यमित्रांकडे कागदपत्रे द्या 

कागदपत्रे नसल्यामुळे रुग्णांना योजनेचा लाभ मिळवून देण्यात अडचणी येतात. त्यामुळे रुग्णांनी किंवा नातेवाईकांनी दाखल होताना कागदपत्रे सोबत ठेवावीत किंवा त्यांचे मोबाईलमध्ये चांगले छायाचित्र काढून ठेवावे. रुग्णालयात दाखल झाल्यानंतर तेथील आरोग्यमित्रांकडे संबंधित कागदपत्रे द्यावीत, असे आवाहन महात्मा फुले जनआरोग्य योजनेचे देविदास बागल यांनी "सकाळ'शी बोलताना केले. तसेच अंतर्भूत रुग्णालयात काही अडचणी असल्यास नोडल ऑफिसरशी संपर्क करावा, असे आवाहनही त्यांनी केले. 

कासजवळ पुन्हा रस्ता खचण्याची भीती, अपघाताची शक्‍यता

  • जिल्ह्यातील कोरोना हॉस्पिटल आणि आरोग्यमित्र... 
     
  • कृष्णा इन्स्टिट्यूट, कऱ्हाड ः डॉ. दिनकर बोर्डे (मो. 9423337347), संभाजी पाटील (8275095430), नीलेश पाटील (8275095437), अविनाश वीर (8275095445). 
  •  
  • शारदा क्‍लिनिक, कऱ्हाड ः डॉ. एस. आर. वायबसे (9408807081), अमोल यादव (8275095431), नेहा फलटणकर (8275095448). 
  •  
  • सह्याद्री हॉस्पिटल, कऱ्हाड ः डॉ. एस. आर. हिंगमिरे (9823199644), राजेश कळसेकर (9422309284). 
  •  
  • घोटवडेकर हॉस्पिटल, वाई ः डॉ. एस. पी. इंगवले (9475988507), प्रकाश साबळे (8275095427). 
  •  
  • गीतांजली हॉस्पिटल, वाई ः डॉ. कविता खोसे-नोडल ऑफिसर (9420637583), आरोग्यमित्र- ईरान्ना म्हेत्रे (8275095450). 
  •  
  • संजीवन हॉस्पिटल, सातारा ः डॉ. मिलिंद ज. मोरे, (9423034065), ज्योती मोरे (8275095429). 
  •  
  • इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स कॉलेज, मायणी : डॉ. दुर्गादास उंडीगावकर (9822345835), रमेश पवार (8275095443). 
  •  
  • जगताप हॉस्पिटल, शिरवळ ः डॉ. दर्शन काकडे (9221084334). 
  •  
  • बेल एअर हॉस्पिटल, पाचगणी ः डॉ. जयसिंग सिसोदिया (9579002377). 
  •  
  • मंगलमूर्ती हॉस्पिटल, सातारा ः पट्टणकुडे अब्दुलगलब (8275095449) आरोग्यमित्र.
     

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

INDW vs AUSW Live: भारतीय संघाचे T20 World Cup मधून पॅकअप! ऑस्ट्रेलियाचा दणदणीत विजय अन् दक्षिण आफ्रिका उपांत्य फेरीत... हरमनप्रीत कौरच्या संघाला अपयश

IND vs IRE 2nd T20I : आयर्लंडने इतिहास रचला! भारतीय संघाला ट्वेंटी-२० मालिकेत नमवले, श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाची लाजीरवाणी सुरुवात

पुणे-मुंबई एक्स्प्रेसवेवर वाढला मृत्यूचा धोका! टोल टाळण्यासाठी 'नो-एंट्री'तून वाहनांची सर्रास एंट्री; नियमांना हरताळ

Latest Marathi News Update : राज्यासह देशविदेशात दिवसभरात काय काय घडलं? वाचा एका क्लिकवर...

Vidarbha Rain Alert : विदर्भासाठी दिलासादायक बातमी! पावसाचा जोर वाढणार, ११ जिल्हे यलो अलर्टवर

SCROLL FOR NEXT