Hit the server down certificates Man tahsildar
Hit the server down certificates Man tahsildar 
सातारा

‘सर्व्हर डाउन’चा दाखल्यांना फटका

विशाल गुंजवटे

बिजवडी - कोरोनानंतर शाळा, विद्यालये, महाविद्यालये विद्यार्थ्यांच्या गर्दीने भरून गेली आहेत. शाळांबरोबरच मुलांच्या प्रवेशासाठी तसेच विविध कारणांसाठी आवश्यक दाखले काढण्यासाठी माण तहसील कार्यालयात पालक, विद्यार्थ्यांची गर्दी होत आहे. मात्र''सर्व्हर डाउन''मुळे विद्यार्थी व पालकांना वेळेवर दाखले मिळत नसल्याने सतत हेलपाटे मारावे लागत आहेत. त्यामुळे प्रवेश घेण्यासाठी अडचणी निर्माण होत आहेत. जिल्हा प्रशासनाने याकडे लक्ष देत सर्व्हर डाउन काळात तात्पुरते ऑफलाइन पद्धतीने दाखले देण्याच्या सूचना तालुका प्रशासनाला द्याव्यात, अशी मागणी पालकांतून होत आहे.

विद्यार्थ्यांच्या प्रवेशासाठी शाळा, महाविद्यालयांत दाखल्यांशिवाय प्रवेश मिळत नाहीत. अर्ज केल्याची पोचपावती दाखवल्यावर प्रवेश देण्याची गरज असताना शाळा प्रशासन अडवणूक करते. त्यामुळे पालकांना विद्यार्थ्याच्या प्रवेशासाठी अडचणी येत आहेत. काही शाळा अर्जाची पावती ग्राह्य धरून विद्यार्थ्यांना प्रवेश देतात. दिवसेंदिवस दाखल्यासाठी सेतू कार्यालय, महा ई-सेवा केंद्रात उभे राहूनही सर्व्हर डाउनमुळे दाखले मिळत नाहीत. सध्या सर्व्हर डाउनमुळे दाखल्यांची ऑनलाइन प्रक्रिया विस्कळित होत असली तरी ऑफलाइन दाखले मिळावेत.

सेतू व सेवा केंद्रातून विद्यार्थ्यांची अडचण होऊ नये, यासाठी कर्मचाऱ्यांकडून उशिरापर्यंत काम केले जात आहे. मात्र, दाखले तयार करताना सर्व्हर डाउन होत असल्याने दाखले मिळवण्यासाठी अडचणी येत आहेत. त्यामुळे पालक व विद्यार्थी अडचणीत सापडले आहेत. नुकतेच दहावीचे निकाल लागले असून त्यांना गुणपत्रिका मिळाली की, ते प्रवेशासाठी दाखले काढण्यासाठी गर्दी करत आहेत.

यावेळी त्यांना दाखले वेळेवर मिळणे गरजेचे आहे. जिल्हा प्रशासनाने यात लक्ष घालत सर्व्हर सेवा सुरळीत करण्यासाठी प्रयत्न करून जोपर्यंत सर्व्हरची अडचण सुटत नाही, तोपर्यंत ऑफलाइन पद्धतीने दाखले देण्याच्या सूचना तहसील कार्यालयाला द्याव्यात, अशी मागणी केली जात आहे.

प्रत्येक दाखले ठराविक कालावधीत दिले जातात. दाखल्यांवर तत्काळ सह्या करून पाठवल्या जातात. मात्र, सर्व्हर डाउनमुळे काहींना दाखले वेळेवर मिळत नसले, तरी राज्य पातळीवरच ती अडचण आहे. त्यात हस्तक्षेप करता येत नाही. ऑफलाइन दाखले देण्यासंदर्भात वरिष्ठांकडून सूचना नाहीत. पालकांनी अगोदरच प्रक्रिया सुरू केल्यास वेळेवर दाखले मिळून प्रवेशास अडचण येणार नाही.

- सूर्यकांत येवले, तहसीलदार, माण.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Accident : दोघांचा जीव घेणाऱ्याला 'अशी' शिक्षा; वाहतूक जागृतीचे फलक रंगवायचे, तीनशे शब्दांचा निबंध लिहायचा अन्...

IPL 2024 RR vs KKR Live Score: कोलकाता-राजस्थान सामन्यावर फिरलं पावसाचं पाणी, सामना करावा लागला रद्द

Pune: नुकतीच 12 वी झालेली, पार्टीसाठी बिल्डर वडिलांची आलिशान गाडी घेतली अन्...; आरोपी तरुणाचा प्रताप समोर

SRH vs PBKS: पंजाबचा शेवटच्या मॅचसाठी ऐतिहासिक निर्णय! आजपर्यंत कोणत्याच संघानं न केलेली गोष्ट करत रचला इतिहास

काय सांगता! एकाच व्यक्तीने केलं 8 वेळा मतदान; व्हिडिओ शेअर करत विरोधकांनी केलाय दावा

SCROLL FOR NEXT