Satara 
सातारा

Video : सातारा जिल्ह्यातील "त्या' हॉटस्पॉट गावच्या नव्वदीतील आजोबांनी हरविले कोरोनाला

संदीप गाडवे

केळघर (जि. सातारा) : पुनवडी (ता. जावळी) येथील कोरोनाबधितांची संख्या 162 वर पोचली असून, गाव कोरोनाचा हॉटस्पॉट बनले आहे. बाधितांचा हा आकडा वाढताना ग्रामस्थांना दिलासाही मिळतो आहे. बाधित 162 पैकी 112 रुग्ण बरे होऊन घरीही आले आहेत. त्यात नव्वदी पार केलेल्या आजोबांचाही समावेश आहे. मोठ्या जिद्दीने कोरोनावर लढाई जिंकून आल्याने या आजोबांचे त्यांच्या नातेवाईकांनी टाळ्यांच्या गजरात स्वागत केले. 

पुनवडीतील अद्याप 50 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. कोरोनावर मात करून आलेल्या आजोबांना मधुमेहाचा त्रास आहे. शिवाय कानाने ऐकायलाही कमी येते. जेवण म्हटले तर जेमतेम दररोज अर्धी चपाती आणि राहणीमान तर अगदी साधे. त्यांची 18 जुलै रोजी पुनवडी गावाबरोबर कोरोना टेस्ट झाली आणि त्यामध्ये ते पॉझिटिव्ह आले. घरात रडारड सुरू झाली. आता आजोबा परत दिसणे नाही, या विचाराने त्यांना गाडीत बसवले आणि काय आश्‍चर्य या नव्वद वर्षांच्या आजोबांनी कोरोनाला हरवले. 27 जुलै रोजी ते सुखरूप आपल्या घरी परत आले.

एका पायावर घातली यशाला गवसणी..., बारावीत मिळवले घवघवीत यश 

पुनवडी येथे संसर्ग वाढल्याने गावातील सर्वच ग्रामस्थांच्या घशातील स्त्रावांचे नमुने घेण्यात आले होते. आख्ख्या गावाची तपासणी झाली होती. मात्र, 162 पैकी 112 जणांनी कोरोनावर मात केली आहे. संस्थात्मक विलगीकरणासाठी उपचार घेत असलेले 50 रुग्णही लवकरात लवकर निगेटिव्ह होऊन गावात परत यावेत व गाव परत पूर्वस्थितीत यावे, अशी मनोकामना पुनवडीचे ग्रामस्थ करत आहेत. गाव प्रतिबंधित क्षेत्रात असल्याने गावातील सर्वच व्यवहार अद्याप ठप्प आहेत. 

संपादन : पांडुरंग बर्गे 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kondhwa Gun Firing : आयुष कोमकरच्या खुनाचा बदला? सहा गोळ्या झाडून कोंढव्यात गणेश काळेचा मर्डर

Jalgaon Politics : जळगाव शहरात 'ठाकरे' गटाला मोठा हादरा! माजी महापौर नितीन लढ्ढांसह १५ नगरसेवकांनी धरला भाजपचा हात

Latest Marathi News Live Update : मनोज जरांगे पाटील डॉक्टर निर्भया यांच्या कुटुंबीयांच्या भेटीसाठी दाखल

Crime News: नाक चाव्याची दहशत! उंदरासारख्या दातांनी अर्धा डझन लोकांची कुरतडली नाकं, जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार

Railway News: प्रवाशांना दिलासा! ट्रेनमध्ये ट्रान्सजेंडर लोकांकडून त्रास होतो का? वाचण्यासाठी रेल्वे प्रशासनाने सोपा मार्ग सांगितला

SCROLL FOR NEXT