Black Magic esakal
सातारा

गोल रिंगणात मुलीला केस मोकळे सोडून बसवले अन् मांडीवर ठेवला 'कोंबडा'

विलास साळुंखे

सुरुर येथील स्मशानभूमीत कुंकवाच्या साह्याने गोलाकार रिंगण करुन त्यात मुलीला केस मोकळे सोडून बसवले.

भुईंज (सातारा) : सुरुर (ता. वाई) येथील स्मशानभूमीत हडपसरहून (पुणे) (Hadapsar Pune) आलेल्या कुटुंबाने एका मांत्रिककरवी अल्पवयीन मुलीची अघोरी पध्दतीने पूजा सुरू असल्याचे जागरुक युवकांमुळे समोर झाले. याबाबतचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर भुईंज पोलिस ठाण्यात (Bhuinj Police Station) अनोळखी सहा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला. गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी शोध घेत हडपसर परिसरातून मुलीच्या कुटुंबीयांसह काही जणांना ताब्यात घेतल्याची माहिती पोलिस अधीक्षक अजयकुमार बन्सल (Police Ajay Kumar Bansal) यांनी दिली.

गोलाकार रिंगणात मुलीला केस मोकळे सोडून बसवले

याबाबतची माहिती अशी, काल दुपारी साडेबारा वाजता सुरुर येथे एका कारमधून तीन पुरुष व तीन महिला आल्या. त्यांच्यासोबत मुलगी होती. त्यांनी सुरुर येथे येण्यापूर्वी त्या मुलीस वाई येथील कृष्णा नदीच्या (Krishna River) घाटावर अंघोळ घातली होती. सुरुर येथील स्मशानभूमीत आल्यानंतर त्यांनी गुलाल व कुंकवाच्या साह्याने गोलाकार रिंगण करुन त्यात मुलीला केस मोकळे सोडून बसवले. त्यानंतर स्मशानातील मृतदेह जाळण्याच्या ठिकाणी अग्नि सुरु करुन मुलीसमोर अंडे, लिंबू, नारळ, सुपारी, काळी बाहुली असे साहित्य ठेवून तिच्या मांडीवर कोंबडा ठेवला. तेथे असणाऱ्या एका मांत्रिकाने मोठ्याने मंत्रोपदेश करीत होता. हा प्रसंग सुरु असताना गावातील काही लोकांनी तेथे गर्दी केली होती.

आमच्या मुलीस बाहेरची बाधा

त्यावेळी विवेक चव्हाण व त्याचे मित्र त्याठिकाणाहून जाताना ही बाब त्यांच्या लक्षात आल्याने त्यांनी त्याचा प्रथम व्हिडिओ बनविला. त्यावेळी तेथे करणी करत असलेल्यांना याबाबत विचारले असता आम्ही पुण्याहून आलो आहोत. आमच्या मुलीस बाहेरची बाधा झाली असून, ती काढण्यासाठी व त्याचा कोंबडा देण्यासाठी आम्ही येथे आलो आहोत, अशी जुजबी माहिती दिली. ग्रामस्थ जमल्यानंतर त्यांनी मुलीला व मांत्रिकाला घेवून कारमधून पलायन केले. तेथे उपस्थित असलेल्यांनी कारचा क्रमांक घेऊन पोलिसांना दिला.

Bhuinj Police Station

काल सकाळी हा व्हिडिओ वायरल झाल्याने पोलिस उपअधीक्षक शितल जाणवे, पोलिस निरिक्षक बाळासाहेब भरणे यांनी घटनास्थळी भेट देऊन सुरुरच्या पोलिस पाटील यांना बोलावून ते पाहणा-या युवकांना तक्रार देण्यास सांगितले. त्यानंतर अनोळखी सहा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत विवेक वामन चव्हाण (रा. सुरुर) यांनी तक्रार नोंदवली आहे. अधिक तपास सहायक पोलिस निरीक्षक आशिष कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली निवास मोरे करीत आहेत.

कारवाईची गरज : डॉ. हमीद दाभोलकर

याबाबत अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे डॉ. हमीद दाभोलकर यांनी सांगितले, की सुरुर येथे अघोरी अंधश्रध्देच्या स्वरुपातील गोष्टी समोर आलेल्या आहेत. एक लहान मुलगी तिच्या मांडीवर कोंबडा ठेवला आहे. सभोवताली हळद, कुंकुचे रिंगण घातले आहे. शेजारी मृतदेह जाळण्याच्या ठिकाणी अग्नि पेटवला आहे. तांत्रिक मोठ्याने मंत्रोपचार करीत आहे. ही नरबळीची तयारी नाही ना? अशी शंका येत आहे. आजही पुरोगामी महाराष्ट्रात अशा घटना घडत आहेत. यावर पोलिस प्रशासनाने जागरुक राहावून कारवाई करणे गरजेचे आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Indian Railways : पुणे, मुंबई, कोल्हापूरहून धावणाऱ्या 8 एक्स्प्रेस गाड्यांना जानेवारी 2026 पासून मिळणार 'LHB' डबे

Ravindra Jadeja: एमएस धोनीची जडेजासोबत राजस्थानमध्ये ट्रेड होण्यापूर्वी नेमकी काय चर्चा झाली? समोर आली अपडेट

Mumbai Crime: मध्यरात्री फिरताना २७ वर्षीय फ्रेंच तरुणीसोबत तरूणानं नको ते कृत्य केलं अन्...; मुंबईत नेमकं काय घडलं?

VIP Mobile Number Process : घरबसल्या तुम्हाला मिळेल VIP मोबाईल नंबर; 10 मिनिटात कन्फर्म फ्री रजिस्ट्रेशन, सीक्रेट ट्रिक पाहा

डिझेल टँकरला बस धडकली, मदिनाला निघालेले हैदराबादचे ४२ यात्रेकरू होरपळले, फक्त बसचा ड्रायव्हर वाचला

SCROLL FOR NEXT