sakal logo 
सातारा

एक तास 'कोरोनासाठी'ला प्रतिसाद शिक्षण विभागाकडून विद्यार्थ्यांसह पालकांची केली जनजागृती

प्रशांत घाडगे

सातारा : कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर विद्यार्थ्यांना ऑनलाइन शिक्षण दिले जात आहे. जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने ऑनलाइन शिक्षण देताना विद्यार्थी व त्यांच्या कुटुंबीयांना कोरोनाला आळा घालण्यासाठी 'एक तास कोरोनासाठी' हा आरोग्यविषयक उपक्रम राबविला. त्यास मोठा प्रतिसाद मिळाला असून, शिक्षकांनी जिल्हाभरात आठ हजार 827 ऑनलाइन सत्रे राबविली. 13 हजार 743 शिक्षक सहभागी झाले होते. 'एक तास कोरोनासाठी-सातारा पॅटर्न' या मोहिमेच्या माध्यमातून जिल्ह्यातील सुमारे तीन लाख 15 हजार 827 हून अधिक विद्यार्थी व पालकांपर्यंत कोरोना जनजागृतीचा संदेश पोहचविल्याची माहिती शिक्षण विभागाने दिली.
 
कोरोनाला आळा घालण्यासाठी राज्य सरकारच्या 'माझे कुटुंब-माझी जबाबदारी' अंतर्गत जिल्हा परिषद विविध उपक्रम राबवित आहे. यामध्ये आरोग्यविषयक उपक्रमावर भर देऊन कोरोनाला आळा घालण्यासाठी प्रयत्न केला जात आहे. हा उपक्रम राबवित सातारा पॅटर्न राज्यभरात राबविण्यासाठी जिल्हा परिषदेचे काम सुरू आहे. यामध्ये विद्यार्थी, पालक, शाळा व्यवस्थापन समिती सदस्य, सरपंच व ग्रामपंचायत सदस्य, ग्रामसेवक, आरोग्य सेवक-सेविका, आशा सेविका, अंगणवाडी सेविका सहभागी झाले होत्या. 

प्राथमिक विभागाचे शिक्षणाधिकारी प्रभावती कोळेकर म्हणाल्या, या उपक्रमात प्राथमिक व माध्यमिक विभागातील विद्यार्थी सहभागी झाले होते. जिल्ह्यातील प्रत्येक केंद्रातून दोन शिक्षकांना सहभागी करून घेण्यात आले होते. या माध्यमातून विद्यार्थी व पालकांपर्यंत आरोग्यविषयक माहिती देण्यात आली. कोरोना जनजागृतीसाठी ऑनलाइन चित्रमय पुस्तिकाही दाखविण्यात आली. 

फत्त्यापूर प्राथमिक शाळेचे सहभागी शिक्षक तुषार घाडगे म्हणाले, विद्यार्थ्यांना शिक्षणाबरोबर आरोग्यविषयक धडे देण्यात आले. उपक्रमात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी कशी काळजी घ्यावी, सॅनिटायझेशन, मास्कचा वापर आदी माहिती देण्यात आली. कोरोनाच्या काळात विद्यार्थ्यांना आरोग्यविषयक जनजागृती केल्याने विद्यार्थी काळजी घेत अधिक सजग होणार आहेत. 
 

संपादन - सुस्मिता वडतिले 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs AFG: वैभव सूर्यवंशी की संजू सॅमसन, कोणाला मिळणार संधी? कर्णधार श्रेयस अय्यरने दिले उत्तर; ईशान किशनच्या दुखापतीवरही अपडेट

Machnur Siddheshwar Temple : माचणूरच्या सिद्धेश्वर मंदिरात प्रणिती शिंदेंकडून भाविकांची सेवा; ५ कोटी ४ लाखांच्या विकासकामांचा आढावा

शनीची वक्री असणं फायदेशीर! 'या' ४ राशींचं नशीब चमकणार; पैशांसह करिअरमध्ये मोठा फायदा

मी अजून लग्न केलेलं नाही...!; राष्ट्रपतींचे ADC राहिलेल्या मेजर ऋषभ सिंह सांब्याल यांनी सांगितलं कारण, म्हणाले, ''नियमानुसार...''

Kolhapur Madhuri Elephant: 'माधुरी' हत्तीणीबाबत 'वनतारा'चे प्रसिद्धीपत्रक! बांधिलकीपोटी भविष्यातही देखभाल करण्याचा शब्द

SCROLL FOR NEXT