illegal sand mining sakal
सातारा

खटाव : अवैध वाळूउपसाप्रकरणी चौघे ताब्यात; 26 लाखांचा मुद्देमाल जप्त

नदीच्या पात्रामध्ये अवैध वाळू उत्खनन सुरू असताना सातारा गुन्हे शाखा व पुसेगाव पोलिसांकडून कारवाई करण्यात आली.

सकाळ वृत्तसेवा

विसापूर : खटाव (Khatav) येथील भराडे वस्ती येथील येरळा नदीच्या पात्रामध्ये अवैध वाळू उत्खनन (Illegal sand Business) सुरू असताना सातारा गुन्हे शाखा (Satara Police crime Police) व पुसेगाव पोलिसांकडून कारवाई करण्यात आली. याप्रसंगी करण राजेंद्र पाचांगणे (वय २२, रा. खटाव), कैलास अंकुश गलांडे (वय २४, रा. खटाव), ओंकार ऊर्फ प्रथमेश धनाजी पाटोळे (रा. वय २१, खटाव), नीलेश बाळू मदने (वय ३०, रा. खटाव) या चार जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. या कारवाईत जेसीबी व वाळूने भरलेली ट्रॅक्टर ट्रॉलीसह २६ लाख १४ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेली माहिती अशी, की अवैध वाळू उत्खनन व चोरटी वाहतूक करणाऱ्यांवर परिणामकारक कारवाई करण्याबाबत एक पथक तयार करून जिल्ह्यात अवैध वाळू तस्करांवर कारवाई करण्याबाबत सूचना दिल्या आहेत. त्या अनुषंगाने सातारा स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक किशोर धुमाळ यांना त्यांचे गोपनीय बातमीदाराकडून माहिती मिळाली होती. या अनुषंगाने आज पहाटे २.४५ वाजण्याच्या सुमारास खटाव येथे भराडे वस्ती येथे येरळा नदीचे पात्रात पोलिस पथकाने छापा टाकला.

त्या वेळी काही लोक जेसीबी, ट्रॅक्टरच्या साह्याने वाळू उपसा करून नदीपात्राजवळ वाळूचा डेपो करीत होते. या ठिकाणी अंदाजे ५ ब्रास वाळूचा डेपो तयार केला असल्याचे निदर्शनास आले. या वाळू डेपोवर महसूल विभागामार्फत कारवाई करण्याची तजवीज ठेवली. त्या वेळी करण पाचांगणे, कैलास गलांडे, ओंकार पाटोळे, नीलेश मदने यांच्यासह जेसीबी व वाळूने भरलेली ट्रॅक्टर ट्रॉलीसह ताब्यात घेतले. पुढील कार्यवाहीसाठी पोलिस ठाणे येथे हजर केले. याबाबत पुसेगाव पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

पोलिस अधीक्षक अजय कुमार बन्सल, अतिरिक्त पोलिस अधीक्षक अजित बोऱ्हाडे यांनी दिलेल्या सूचनेप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखा पोलिस निरीक्षक किशोर धुमाळ यांच्या आदेशानुसार पोलिस उपनिरीक्षक गणेश वाघ, सहायक फौजदार तानाजी माने, हवलदार संतोष पवार, लक्ष्मण जगधने, साबीर मुल्ला, नितीन गोगावले, मंगेश महाडिक, अमोल माने, अमित सपकाळ, अर्जुन शिरतोडे, स्वप्नील माने, शिवाजी भिसे, गणेश कापरे, स्वप्नील दौंड, प्रवीण पवार, मोहसीन मोमीन, मयूर देशमुख व पुसेगाव पोलिस ठाण्यातील हवालदार पाटील व चालक डोंबे यांनी कारवाईमध्ये भाग घेतला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Rate Today : सोन्याच्या भावात तब्बल 'इतक्या' रूपयांची वाढ, चांदी मात्र ५००० रुपयांनी घसरली; जाणून घ्या तुमच्या शहरातील आजचा ताजा भाव

बापरे श्रद्धा कपूरला काय झालं! ‘ईठा’च्या चित्रीकरणात दुखापत; लावणी सीक्वेन्सदरम्यान पायाला फ्रॅक्चर

Latest Marathi News Live Update: : लोखंडवाला परिसरात रेंज रोव्हर कारचा अपघात

Pune News : ऊसाच्या वजन चोरीवर साखर आयुक्तांचा कडक पवित्रा! 'भरारी पथके' कार्यान्वित, वजनकाटा तपासणीत आयटी तज्ज्ञ होणार सहभागी

Pune Accident: मी पोलिसाचा मुलगा, पार्टी करून आलेल्या तरुणांचा नारायण पेठेत धिंगाणा, अपंग व्यक्तीला धडक! रात्री नेमकं काय घडलं?

SCROLL FOR NEXT