सातारा

निष्क्रिय सरकारला पदवीधर निवडणुकीत जागा दाखवा; हर्षवर्धन पाटलांचा हल्लाबोल

विलास साळुंखे

भुईंज (जि. सातारा) : पुणे विभाग शिक्षक व पुणे विभाग पदवीधर मतदार संघातील भारतीय जनता पक्ष पुरस्कृत व महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेचे उमेदवार जितेंद्र पवार व पुणे विभाग पदवीधर मतदारसंघाचे भाजपचे अधिकृत उमेदवार संग्राम देशमुख यांना मोठ्या मताधिक्‍यने विजयी करा, असे माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांनी केले. 

वाई येथे आयोजित बैठकीत प्रचाराचा प्रारंभ करताना ते बोलत होते. माजी आमदार व किसन वीर सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष मदन भोसले, शिवाजी विद्यापीठ अधिसभा सदस्य ऍड. जगदीश पाटणे, भाजपचे वाई तालुकाध्यक्ष रोहिदास पिसाळ, "किसन वीर'चे संचालक मधुकर शिंदे, सामाजिक कार्यकर्ते सुनील शिंदे, संतोष जमदाडे, प्रा. प्रशांत सुतार, नगरसेवक महेंद्र धनवे, नगरसेविका वासंती ढेकाणे उपस्थित होते. 

आजपासून नियोजन करून, तसेच मतदारांना मतदान प्रक्रिया समजावून देण्याचे काम कार्यकर्त्यांनी करावे. निष्क्रिय सरकारच्या एक वर्षाच्या कालावधीनंतरची ही निवडणूक असल्याने मतदानाच्या माध्यमातून महाराष्ट्राला योग्य संदेश द्यावा, असे आवाहनही श्री. पाटील यांनी केले. या निवडणुकीत भाजपच्या उमेदवाराला वाई विधानसभा मतदारसंघातून मताधिक्‍य मिळवून देण्याची ग्वाही मदन भोसले यांनी दिली. ऍड. जगदीश पाटणे यांनी वाई तालुक्‍यात मोठ्या प्रमाणात पदवीधर मतदार नोंदणी केल्याचे सांगितले. 

संपादन : बाळकृष्ण मधाळे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Multibagger Stock: 1 लाखांचे झाले तब्बल 1.35 कोटी! फक्त 6 महिन्यांतच पैसा तिप्पट; पाहा गुंतवणूकदारांना मालामाल करणारा शेअर

Ganeshotsav Rules: गणेशोत्सवात नियमभंग करणाऱ्या मंडळांवर गुन्हे दाखल; वाघोली पोलिसांचा कडक इशारा

Ayurvedic Remedies for Arthritis: संधिवातामुळे चालणंही कठीण होतंय? मग 'हे' ३ आयुर्वेदिक उपाय देतील सांध्यांना आराम!

Nagpur Crime : जादूटोण्याच्या संशयातून सासऱ्याकडून कुऱ्हाडीने सुनेचा खून

Oppo Smartphone: 7000mAh बॅटरी अन् 120Hz डिस्प्ले! 16 सप्टेंबरला लाँच होतोय Oppo चा सर्वात स्वस्त स्मार्टफोन! किंमत फक्त...

SCROLL FOR NEXT