Nana Patole esakal
सातारा

Loksabha Election : आचारसंहिता लागल्यानंतर काँग्रेसमध्ये येणाऱ्यांची संख्या बघा किती असेल; नाना पटोलेंचं सूचक विधान

भाजप सरकार सत्तेत आल्यापासून धर्माच्या नावाने दंगली भडकल्या आहेत.

सकाळ डिजिटल टीम

‘‘मराठा व धनगर आरक्षणात देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी समाजाला फसविले आहे.

सातारा : मराठा आरक्षण (Maratha Reservation) देताना भारतीय जनता पक्षाने (BJP) मराठ्यांना फसविले आहे. देशात जाती-जातीत भेद निर्माण करण्याचे काम त्यांनी केले आहे. आरक्षणमुक्त भारत करण्याचा डाव भाजप आखत असल्याचा आरोप काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी केला आहे. दरम्यान, आगामी लोकसभा निवडणुकांमध्ये देशभरात इंडिया आघाडी सत्तेत येणार असल्याचा विश्‍वासही त्यांनी व्यक्त केला.

येथे काँग्रेस (Congress) भवनात श्री. पटोले यांनी विविध विषयांवर माध्यमांशी संवाद साधला. श्री. पटोले म्हणाले, ‘‘मराठा व धनगर आरक्षणात देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी समाजाला फसविले आहे. याआधी जाती-जातीत राज्यात कधीही वाद झाला नव्हता. मात्र, भाजप सरकार सत्तेत आल्यापासून धर्माच्या नावाने दंगली भडकल्या आहेत. देशात महागाई, बेरोजगारी वाढली असून, देशाच्या प्रतिमेला काळिमा लावण्याचा प्रयत्न भाजपचा सुरू आहे.

दरम्यान, महाविकास आघाडीची जागा वाटपाची चर्चा अंतिम टप्प्यात आली असून, येत्या काही दिवसांत जागांचे सूत्र निश्‍चित केले जाणार आहे. सद्य:स्थितीत इतर पक्षातून भाजपमध्ये जाणाऱ्या नेत्यांची संख्या अधिक असली, तरी आचारसंहिता लागल्यानंतर काँग्रेसमध्येही येणाऱ्यांची संख्या बघा किती असेल, असे सूचक वक्तव्य श्री. पटोले यांनी केले. या वेळी जिल्हाध्यक्ष डॉ. सुरेश जाधव, श्रीरंग चव्हाण, नरेश देसाई, महिला आघाडीच्या अध्यक्षा अल्पना यादव, रजनी पवार, ॲड. दत्तात्रेय धनावडे, श्रीकांत चव्हाण व इतर पदाधिकारी उपस्थित होते.

आदर्श घोटाळा म्हणणाऱ्यांनी पक्षात कसे घेतले?

आदर्श घोटाला किसने किया, असे म्हणत काँग्रेस पक्षातील नेत्यांवर टीका करणाऱ्या नरेंद्र मोदी यांनी अशोक चव्हाणांना भाजपमध्ये कसे घेतले? असा प्रश्‍न उपस्थित करत नाना पटोले यांनी श्री. चव्हाण भाजपात गेल्याने राज्यात काँग्रेसवर कुठलाही परिणाम होणार नसल्याचे सांगितले. भाजपमध्ये त्यांची जागा कुठे आहे, हे अधिवेशनात दिसले असून, त्यांच्या नेतृत्वात काँग्रेस पक्षाची अवस्था जनतेने पाहिल्याचा टोला पटोले यांनी अशोक चव्हाणांना लावला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Elderly Woman Property Fraud: ‘ज्येष्ठ महिलेला न्यायासाठी वणवण फिरवू नका!’ ; मुंबई उच्च न्यायालयाकडून पोलिसांना तपासाचा आदेश

Government Job Fraud: सरकारी नोकरीचे आमिष दाखवून सुशिक्षित बेरोजगार तरुणाची २० लाखांची फसवणूक

''...तर मी जीव देईन'' २०१२ मध्ये निवडणुकीपूर्वी मनमोहन सिंग असं का म्हणाले होते? माजी निवडणूक आयुक्तांकडून धक्कादायक खुलासा

संस्कृतच्या विद्यार्थ्यांना दहावीनंतर होता येणार डॉक्टर! साडेसात वर्षांचा नवा अभ्यासक्रम, संस्कृत विद्यापीठाचा निर्णय

Maharashtra Saint Tradition: संत आणि वारीमुळेच महाराष्ट्राची अस्मिता टिकली; सकाळच्या व्याख्यानमालेत डॉ. सदानंद मोरे यांचे प्रतिपादन

SCROLL FOR NEXT