MLA Ramraje Nimbalkar esakal
सातारा

Ramraje Nimbalkar : 'बौद्ध समाजाच्या उमेदवारीस विरोध नाही, पण..'; विधानसभा निवडणुकीबाबत काय म्हणाले रामराजे?

Buddhist Community : फलटण- कोरेगाव विधानसभा मतदारसंघ (Phaltan- Koregaon Assembly Constituency) अनुसूचित जातीसाठी आरक्षित आहे.

सकाळ डिजिटल टीम

फलटण- कोरेगाव विधानसभा मतदारसंघातील बौद्ध समाजाने ‘एकच निर्धार...बौद्ध आमदार’ अशी प्रतिज्ञा घेत तालुक्यात संवाद अभियान सुरू केले आहे.

फलटण शहर : बौद्ध समाजाच्या (Buddhist Community) उमेदवारीला आपला विरोध नाही. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे आपण रीतसर उमेदवारीची मागणी करावी, असे प्रतिपादन विधान परिषदेचे माजी सभापती, आमदार रामराजे नाईक निंबाळकर (Ramraje Naik Nimbalkar) यांनी येथे केले.

फलटण- कोरेगाव विधानसभा मतदारसंघ (Phaltan- Koregaon Assembly Constituency) अनुसूचित जातीसाठी आरक्षित आहे. आगामी विधानसभा निवडणुकीत बौद्ध समाजाला राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून उमेदवारी द्यावी, अशी मागणी संविधान समर्थन समितीच्या वतीने रामराजे निंबाळकर यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली. त्या वेळी ते बोलत होते.

फलटण- कोरेगाव विधानसभा मतदारसंघातील बौद्ध समाजाने ‘एकच निर्धार...बौद्ध आमदार’ अशी प्रतिज्ञा घेत तालुक्यात संवाद अभियान सुरू केले आहे. या अभियानास तालुक्यातील सर्व गावांत उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. या अभियानांतर्गत प्रमुख पक्षांकडे बौद्ध उमेदवार द्यावा, अशी मागणी करण्यात येणार आहे. त्या अनुषंगाने आमदार रामराजे निंबाळकर यांची भेट घेऊन, संविधान समर्थन समितीच्या वतीने राष्ट्रवादी काँग्रेसकडे उमेदवारीची मागणी करण्यात आली.

या निवेदनामध्ये म्हटले आहे, की फलटणमधील अनुसूचित जाती प्रवर्गातील विविध पक्षांचे नगरसेवक, पदाधिकारी व कार्यकर्ते, आगामी विधानसभा निवडणुकीत, बौद्ध समाजाचा प्रतिनिधी द्यावा, असा प्रस्ताव देत आहोत. आपल्या निर्णयामुळे येथील अनुसूचित जातीमधील संख्याबहुल बौद्ध समाजाला विधानसभेमध्ये प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळेल.

आपल्या पक्षाची ताकद व बौद्ध समाजाचे संख्‍याबळ यामुळे निश्चितच आपला उमेदवार आमदार होईल. या विधानसभेनंतर होणाऱ्या जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका या सर्व निवडणुकीला सर्व बौद्ध समाज आपल्या पाठीशी एकनिष्ठेने उभा राहील. येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत आपल्या माध्यमातून आपणास योग्य वाटणाऱ्या तथा आपल्या पक्षासाठी कार्यरत असणाऱ्या बौद्ध समाजाच्या व्यक्तीला आमदारकीसाठी उमेदवारी मिळावी.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Prithviraj Chavan statement: 'ऑपरेशन सिंदूर'च्या पहिल्याच दिवशी झाला होता भारताचा पराभव - पृथ्वीराज चव्हाणांचं विधान!

IPL 2026 All Teams: ग्रीन सर्वात महागडा खेळाडू, तर अनकॅप्ड खेळाडूंही मलामाल; लिलावानंतर पाहा सर्व संघांतील खेळाडूंची यादी

IPL 2026 Auction Live: जाता जाता Prithvi Shawला दिलासा! एका फ्रँचायझीला आली दया... घेतलं एकदाचं संघात, बघा कोणाकडून खेळणार

PL 2026 Auction : पप्पू यादव यांचा मुलगा आयपीएलमध्ये खेळणार; लिलावात मोजली तगडी रक्कम, जाणून घ्या कोणत्या संघाची झाली कृपा

मोठी बातमी! सिडनीतील दहशतवादी हल्ल्याचं भारतीय कनेक्शन उघड; तेलंगणा पोलिसांनी केली पुष्टी...

SCROLL FOR NEXT