CM Eknath Shinde sakal
सातारा

CM Eknath Shinde : येणाऱ्या निवडणुकीत मतपेटीद्वारे जनताच विरोधकांचा एक्काऊंटर करेल; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

बदलापूर घटना घडल्यानंतर विरोधक नराधमाला फाशी द्या असे म्हणत होते. ज्यावेळी पोलिसांवर त्या नाराधमाने गोळी झाडली.

हेमंत पवार

दौलतनगर : बदलापूर घटना घडल्यानंतर विरोधक नराधमाला फाशी द्या असे म्हणत होते. ज्यावेळी पोलिसांवर त्या नाराधमाने गोळी झाडली. त्यावेळी पोलिसांनी त्या त्याच्यावर गोळीबार केला. त्यामुळे विरोधक त्याला का मारले म्हणून बेंबीच्या देठापासून ओरडू लागले. अशा दुटप्पी लोकाचा जनता येणाऱ्या निवडणुकीत मत पेटी द्वारे एक्काऊंटर करेल, असा सणसणीत टोला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधकांना लगावला.

पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या विशेष प्रयत्नातून पाटण (जि सातारा )विधानसभा मतदारसंघामध्ये काळोली येथील लोकनेते बाळासाहेब देसाई बहुउद्देशीय कृषी संकूल, पाटण नगरपंचायत नवीन नळपाणी पुरवठा योजनेच्या कामाचे भूमिपूजन, नवारस्ता-नाडे येथील छत्रपती शिवाजी महाराज यांचे अश्वारुढ पुतळयाचे लोकार्पण,

मल्हारपेठ येथील लोकनेते बाळासाहेब देसाई ग्रामसचिवालयाचे लोकार्पण, वाटोळे येथील लोकनेते बाळासाहेब देसाई राज्य उत्पादन शुल्क विभागाचे प्रशिक्षण केंद्राचे ई भूमिपूजन, मोरणा गुरेघर येथील बंदिस्त पाईप लाईन आणि नाटोशी उपसा सिंचन योजनेच्या कामांचे ई भूमिपूजन,

तारळी प्रकल्पामधील 50 मीटर व 100 मीटर उंचीवरील उपसा सिंचन योजनेच्या कामांचे लोकार्पन अशा 289 कोटी रुपयांचे कामांचे भूमिपूजन व लोकार्पण मुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते झाले. त्यानंतर ते बोलत होते. लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष यशराज देसाई, मोरणा शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष रविराज देसाई,आदी उपस्थित होते.

मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, आम्ही उठाव केला त्यावेळी शंभूराजे देसाई माझ्याबरोबर खांद्याला खांदा लावून होते. मी मुख्यमंत्री झाल्यावर सहा महिन्यात राज्य पहिल्या क्रमांकवर नेले. शिंधुदुर्ग येथे येणाऱ्या शिव जयंती पूर्वी पुतळा उभा करणार आहे ,

बदलापूर घटनेतील नराधमांला विरोधक फाशी द्या म्हणत होते. ज्यावेळी पोलिसांवर नाराधमाने बंदूक चालवली त्यावेळी पोलिसांनी त्याच्यावर गोळीबार केला. त्यामुळे विरोधक त्याला का मारले म्हणून बेंबीच्या देठापासून ओरडू लागलेआहेत ल. अशा दुटप्पी लोकाचा जनता येणाऱ्या निवडणुकीत मत पेटी द्वारे एक्काऊंटर करेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

जस्टिस यशवंत वर्मा प्रकरणात 'एफआयआर'ची मागणी करणारी याचिका दिल्ली उच्च न्यायालयाने फेटाळली; कोर्टाने नेमकं काय म्हटलं?

Asian Games 2026: १३ वर्षांच्या शाळकरी मुलीनं जिंकलं 'Gold'; भल्याभल्यांना जे नाही जमलं, ते करून दाखवलं

साठी गाठूनही सलमान खान फिट कसा? घरचं जेवण, वर्कआउट अन्... जाणून घ्या भाईजानचा फिटनेस फंडा

‘अपशब्द वापरण्यापेक्षा…’ शशांक केतकर ट्रोलर्सवर भडकला? उत्तर देत म्हणाला...आधी मी काय म्हणतोय ते...'

Marathi News Live Updates: पुण्यात गहाळ झालेली रोकड पोलिसांनी दोन दिवसांत शोधली

SCROLL FOR NEXT