Satara News sakal
सातारा

Satara News : लोणंदमध्ये फुलला भक्‍तीचा मळा;माउलींचा जयघोष

थोडेसे उन्ह, ढगाळ वातावरण, मधूनच येणारी वाऱ्याची झुळूक, टाळ-मृदंुगांचा गजर, भगव्या पताका, माउलींचा घोष अन् अभंग आळवत लाखो वारकऱ्यांच्या उपस्थितीत आज संत ज्ञानेश्वर माउलींच्या पालखी सोहळ्याचे जिल्ह्यात आगमन झाले.

सकाळ वृत्तसेवा

सातारा : थोडेसे उन्ह, ढगाळ वातावरण, मधूनच येणारी वाऱ्याची झुळूक, टाळ-मृदंुगांचा गजर, भगव्या पताका, माउलींचा घोष अन् अभंग आळवत लाखो वारकऱ्यांच्या उपस्थितीत आज संत ज्ञानेश्वर माउलींच्या पालखी सोहळ्याचे जिल्ह्यात आगमन झाले. यावेळी झालेल्या विठूनामाच्या गजराने लोणंदचे अवघे आसमंत दुमदुमून गेले.

संत ज्ञानेश्वर पालखी सोहळ्याचे आज सातारा जिल्ह्यात आगमन झाले. या आगमनाचे साक्षीदार होण्यासाठी आणि माउलींच्या पादुकांच्या दर्शनासाठी आज लोणंद येथे अफाट जनसागर लोटला होता. पालखी सोहळा दोन दिवस लोणंद येथे विसवणार आहे. या काळात पादुकांच्या दर्शनासाठी राज्याच्या विविध भागांतून विशेषतः सातारा, सांगली, कोल्हापूर जिल्ह्यांतून नागरिक मोठ्या संख्येने येतात. आज सकाळपासूनच लोणंदकडे जाणाऱ्या वाहनांची रीघ लागली होती. लोणंद येथून चालत जाऊन नीरा नदी पलीकडे पालख्यांच्या विसाव्याच्या ठिकाणी भाविक दर्शनासाठी जात होते. तेथे दर्शनासाठी मोठ्या रांगा लागल्या होत्या.

अनेक वारकरी निरेतील सकाळचे विविध धार्मिक कार्यक्रम आटोपून लोणंदकडे जात होते. रस्त्याला त्यामुळे सर्वत्र गर्दी होती. लोणंदकडे वारकऱ्यांची येणारी वाहने अन् पादुका दर्शनासाठी आसुसलेल्या नागरिकांच्या गर्दीने तुडुंब वाहत होते. वारकऱ्यांचे जथे लोणंद नगरीकडे जात होते. त्यांच्या खांद्यावरील पताका हवेत लहरत होत्या. या हजारो पताकांनी आकाश भरले होते. या सोहळ्यात आबालवृद्ध सहभागी झाले आहेत. महिलांची संख्याही मोठी आहे. कोणी तुळशी वृंदावन, तर कोणी विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती डोक्यावर घेऊन महिला वाटचाल करत होते. त्यामध्ये युवतीही सहभागी होत्या. महिलांबरोबर चिमुकले ही वाटचाल करताना आढळत होते. संत ज्ञानेश्वर माऊली, संत तुकारामांचे अभंग म्हणत वारकरी लयीत पंढरीच्या ध्यासाने वाटचाल करत होते.

पोलिसांचा मोठा बंदोबस्त

पालख्यांचे आगमन जिल्ह्यात होताना लोणंद ते नीरा या मार्गावर वाहने आणि वारकरी, दर्शनासाठी आलेल्या भाविकांच्या गर्दीने नेहमी वाहतुकीची कोंडी होते. मात्र, आज पोलिसांनी काळजी घेतल्याने ही कोंडी थोडी सुसह्य झाली. मार्गावर पोलिस जागोजागी उभे राहून वारकरी आणि वाहनचालकांना मार्गदर्शन करत होते. आज पोलिस डॉग स्कॉडसह पोलिस अधीक्षक समीर शेख, पोलिस उपअधीक्षक आंचल दलाल व अधिकारी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pakistan T20 WC Qualification Scenario : भारताकडून हार अन् पाकिस्तानी बेजार! गुणतालिकेत उलथापालथ, अमेरिका दुसऱ्या क्रमांकावर, पाकडे Super 8s मध्ये कसे पोहोचणार?

IND vs PAK T20 WC: हा विजय भारतीयांसाठी! पाकिस्तानच्या मुसक्या आवळल्यानंतर सूर्यकुमार यादवचं 'मन' जिंकणारं विधान...

Harshvardhan Sapkal : 'मुंबईतील रस्त्याला 'टिपु सुलतान'चं नाव देण्याचा भाजपने दिला होता प्रस्ताव', हर्षवर्धन सपकाळांनी थेट पुरावाच सादर केला..

IND vs PAK T20 WC: ८-१ ! कुठेही खेळा, पाकिस्तानचे वस्त्रहरण निश्चित! टीम इंडिया दणदणीत विजयासह Super 8s मध्ये; शेजाऱ्यांचा पुढचा मार्ग खडतर

IND vs PAK T20 WC: आधी झोडले, मग ट्रोल केले! पाकिस्तानची इभ्रत वेशीला टांगल्यानंतर इशान किशन काय म्हणाला वाचा...

SCROLL FOR NEXT