सातारा

सातारा जिल्ह्यातील निकोप हॉस्पिटल सील; प्रांताधिकाऱ्यांची कारवाई

व्यंकटेश देशपांडे

फलटण : कोविड विषाणू संकट काळात शासकीय यंत्रणेस सहकार्य करत नसल्याच्या कारणावरून येथील निकोप हॉस्पिटल रात्री उशिरा सील करण्यात आले. जिल्हाधिकारी शेखर सिंह यांच्या आदेशानुसार कोविडसाठी निकोप हॉस्पिटल अधिग्रहण करण्यात आले होते. परंतु, हे हॉस्पिटल प्रशासनाकडे हस्तांतरित करण्यासाठी डॉक्‍टर्स सहकार्य करत नसल्याने फलटणचे इन्सिडेंट कमांडर तथा प्रांताधिकारी शिवाजीराव जगताप यांनी हे हॉस्पिटल सील केले. 
सातारा जिल्ह्यातील बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा

जिल्ह्यात कोरोना विषाणूबाधित रुग्णांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये वाढ सुरू आहे. पुढील काळात कोरोना संसर्ग रुग्णसंख्या वाढण्याची शक्‍यता लक्षात घेऊन जिल्हाधिकाऱ्यांनी फलटणमधील काही रुग्णालये अधिग्रहित केलेली आहेत. त्यानुसार येथील डॉ. जे. टी. पोळ यांना त्यांचे निकोप हॉस्पिटल अधिग्रहित करण्याबाबत सूचित करण्यात आले होते. परंतु, निकोप हॉस्पिटल हे शासनास कोणत्याही प्रकारचे सहकार्य करत नव्हते. त्यामुळे शासनाकडून कठोर पावले उचलत, निकोप हॉस्पिटल सील करण्यात आले.

पुरस्कारासाठी राजकीय पाठबळ हवे की, आणखी काय? मराठमोळ्या प्रियांकाचे मंत्र्यांना ट्‌विट

निकोप हॉस्पिटल हे कोविडच्या रुग्णांसाठी अधिग्रहण केलेले होते. परंतु, कोविडच्या ज्या रुग्णांना ऑक्‍सिजनची गरज आहे, त्यांना निकोप हॉस्पिटलमध्ये हलवण्याबाबत हॉस्पिटलमधील डॉक्‍टर्स व त्यांचा स्टाफ सहकार्य करत नव्हते. त्यामुळे अखेर हे हॉस्पिटल सील करण्याचे पाऊल उचलावे लागले आहे. आता निकोप हॉस्पिटलमधील अतिदक्षता विभाग हा कोविड रुग्णांसाठी अधिग्रहित केला असून, तिथे ऑक्‍सिजनची आवश्‍यकता असलेल्या कोविड रुग्णांना हलवण्यात येणार असल्याचे शासकीय अधिकाऱ्यांनी सांगितले.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tembhurni Crime : गाडी पार्किंगच्या कारणावरून सुरू असलेले भांडण सोडविण्यास गेलेल्या एकाचा चाकूने भोसकून खून; दोन संशयित आरोपींना अटक

Degloor Crime : बनावट ग्राहकाच्या सापळ्यात मोटारसायकल चोर जेरबंद; १० चोरीच्या दुचाकींसह एक आरोपी ताब्यात, एक फरार

Badnapur News : ‘साहेब, शेतकऱ्यांना भरीव मदत द्या, जनावरांसाठी चारा द्या’; वरुडीतील शेतकऱ्यांची महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे आर्जवी मागणी

Nagpur Crime : दारुड्या प्रवाशाचा हायव्होल्टेज ड्रामा! दारूच्या नशेत पकडली ठाण्यात पोलिसाची कॉलर

Gujarat UCC: गुजरातमध्ये समान नागरी कायदा लागू करण्यास राष्ट्रपतींची मंजुरी; काय असेल नियमावली?

SCROLL FOR NEXT