सातारा

कोळगेवाडीच्या विवाहितेची मस्करवाडीत आत्महत्या

राजेश पाटील

ढेबेवाडी (जि. सातारा) : कोळगेवाडी (काळगाव, ता. पाटण) येथील विवाहितेने माहेरी मस्करवाडी (कसणी, ता. पाटण) येथे उंदीर मारण्याचे विषारी औषध खाऊन आत्महत्या केली. मनीषा जयेश कोळगे (वय 20) असे संबंधित विवाहितेचे नाव आहे. येथील पोलिस ठाण्यात या घटनेची नोंद झाली आहे. 

याबाबत पोलिसांची माहिती अशी, मनीषा यांचा विवाह 15 जून 2019 रोजी कोळगेवाडी येथे झाला होता. काही दिवसांपासून त्या माहेरी मस्करवाडी (कसणी) येथे राहण्यास होत्या. शुक्रवारी (ता.4 ) दुपारी त्यांनी घरात उंदीर मारण्याचे औषध खाल्ले. त्रास होऊ लागल्यानंतर घरातील लोकांच्या लक्षात हा प्रकार आला. त्यांनी तातडीने त्यांना कऱ्हाड येथील एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. तेथे उपचार सुरू असताना काल रात्री त्यांचा मृत्यू झाला. उपजिल्हा रुग्णालयात उत्तरीय तपासणीनंतर मनीषा यांचा मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. दुपारी कोळगेवाडी येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. येथील पोलिस ठाण्यात या घटनेची नोंद झाली आहे. सहायक पोलिस निरीक्षक उत्तम भजनावळे व त्यांच्या सहकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देवून पाहणी केली. सहायक फौजदार रवींद्र पानवळ तपास करत आहेत. 

संपादन : बाळकृष्ण मधाळे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs AFG: वैभव सूर्यवंशी की संजू सॅमसन, कोणाला मिळणार संधी? कर्णधार श्रेयस अय्यरने दिले उत्तर; ईशान किशनच्या दुखापतीवरही अपडेट

Machnur Siddheshwar Temple : माचणूरच्या सिद्धेश्वर मंदिरात प्रणिती शिंदेंकडून भाविकांची सेवा; ५ कोटी ४ लाखांच्या विकासकामांचा आढावा

शनीची वक्री असणं फायदेशीर! 'या' ४ राशींचं नशीब चमकणार; पैशांसह करिअरमध्ये मोठा फायदा

मी अजून लग्न केलेलं नाही...!; राष्ट्रपतींचे ADC राहिलेल्या मेजर ऋषभ सिंह सांब्याल यांनी सांगितलं कारण, म्हणाले, ''नियमानुसार...''

Kolhapur Madhuri Elephant: 'माधुरी' हत्तीणीबाबत 'वनतारा'चे प्रसिद्धीपत्रक! बांधिलकीपोटी भविष्यातही देखभाल करण्याचा शब्द

SCROLL FOR NEXT