सातारा

सातारा जिल्हा परिषदेचा दिल्लीमध्ये डंका

सकाऴ वृत्तसेवा

केंद्र शासन जिल्हा परिषदेला निधी वितरित करणार असून, सातारा जिल्हा परिषदेचा पुन्हा एकदा दिल्लीत डंका वाजला आहे.

सातारा: देशाच्या स्वातंत्र्याच्या ७५ वर्षांच्या निमित्ताने 'आझादी का अमृतमहोत्सव' या उपक्रमाअंतर्गत केंद्र शासनाने उत्कृष्ट कामगिरी केलेल्या संस्थांची निवड केली आहे. त्यामध्ये सातारा जिल्हा परिषदेचा समावेश झाला आहे. केंद्र शासन जिल्हा परिषदेला निधी वितरित करणार असून, सातारा जिल्हा परिषदेचा पुन्हा एकदा दिल्लीत डंका वाजला आहे.

देशाच्या स्वातंत्र्याच्या ७५ वर्षांच्या निमित्ताने 'आझादी का अमृतमहोत्सव' या उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. या उपक्रमांतर्गत केंद्र शासनाने उत्कृष्ट कामगिरी केलेल्या ७५ पंचायत राज संस्थांची निवड केली आहे. राज्यातील सातारा, नगर, जालना, सोलापूर, गडचिरोली, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, गोंदिया, बुलडाणा, भंडारा या जिल्हा परिषदेचा समावेश होता. या पंचायत राज संस्थांना केंद्र शासनामार्फत निधी दिला जाणार आहे. त्यामध्ये सातारा जिल्हा परिषदेचा समावेश आहे. याबाबतचे पत्र राज्याच्या ग्रामविकास विभागाकडून जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा यांना आले आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेचा दिल्लीत डंका वाजला आहे.

जिल्हा परिषदेचे अध्यक्ष उदय कबुले, उपाध्यक्ष प्रदीप विधाते, शिक्षण सभापती मानसिंगराव जगदाळे, कृषी सभापती मंगेश धुमाळ, महिला व बालकल्याण सभापती सोनाली पोळ, समाजकल्याण सभापती कल्पना खाडे, मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष धोत्रे, सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी मनोज जाधव, ग्रामपंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी अविनाश फडतरे यांच्यासह अन्य विभागांच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी स्वातंत्र्याच्या ७५ वर्षांच्या निमित्ताने आझादी का अमृतमहोत्सव या उपक्रमांतर्गत विविध कार्यक्रमांचे आयोजन केले होते. त्यामुळे या उपक्रमांची दखल केंद्र शासनाने घेतली.

जिल्हा परिषदेने केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी केली. त्यामुळे झेडपीचा विकासाभिमुख कारभार सुरू आहे. केंद्र व राज्य शासनाच्या प्रत्येक योजनांमध्ये जिल्हा परिषदेचे विविध विभागांतील अधिकारी व कर्मचारी सहभागी होऊन या योजना तळागाळापर्यंत कशा पोचतील. त्यासाठी सातत्याने प्रयत्न केले जात आहेत. त्यामुळे जिल्हा परिषदेला केंद्र व राज्य शासनाने विविध पुरस्कारांनी गौरव केला आहे.

जिल्हा परिषद केंद्र व राज्य शासनाचे विविध उपक्रम जिल्ह्यात प्रभावीपणे राबवत आहे. सर्व पदाधिकारी, अधिकारी व कर्मचाऱ्यांचे योगदान असल्याने सातारा जिल्हा परिषदेची निवड केंद्र शासनाने केली असून, ही अभिमानास्पद गोष्ट आहे.

- उदय कबुले, अध्यक्ष, जिल्हा परिषद.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Army New Uniform: भारतीय लष्कराचा मोठा बदल! ८ वर्षांनंतर नवा ड्रेस कोड लागू; ब्रिटिशकालीन परंपरांना रामराम, आर्मीचा 'देसी' लूक चर्चेत

T20 World Cup: पाकिस्तानी खेळाडूंशी हँडशेक करणार का? भारताची कर्णधार हरमनप्रीत कौरने स्पष्टच दिलं उत्तर

Matheran Toy Train: माथेरानची राणी ४ महिने बंद, नवी सेवा सुरू होणार; मध्य रेल्वेचा मोठा निर्णय, कधीपासून आणि का?

Manoj Jarange Support : तुकाराम मुंढेंची बदली कराल तर... मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा

Latest Live Updates Marathi: गृह लक्ष्मी' आणि 'गृह ज्योती' यांसारख्या जनहितार्थ असलेल्या गॅरंटी योजना बंद केल्या जाणार नाहीत- शिवकुमार

SCROLL FOR NEXT