bhilar book villages 
सातारा

पुस्तक वाचा, आम्हाला कळवा! पुस्तकांच्या गावचा अभिनव उपक्रम

सिद्धार्थ लाटकर

सातारा : भारतरत्न डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांचा जन्मदिन (१५ ऑक्टोबर) महाराष्ट्रात 'वाचन प्रेरणा दिन' म्हणून साजरा केला जातो. गेल्या पाच वर्षांपासून महाराष्ट्र शासनाच्या वतीने हा उपक्रम योजला जात आहे. उत्साही आणि जाणकार वाचकांमुळे वाचन प्रेरणा दिन हा आता एक लोकोत्सव झाला आहे. पुस्तकांचं गाव, भिलार येथेही गेली दोन वर्षे अभिनव उपक्रम-कार्यक्रम योजले गेले.

कोरोना संकटाच्या काळात नागरिकांवर प्रवासाच्या मर्यादा असल्याने, यंदाचा वाचन प्रेरणा दिन अनोख्या, वेगळ्या पद्धतीने साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. वाचकांनी १५ ऑक्टोबर पर्यंत किमान एक (१) पुस्तक वाचावं असा आठवडाचा काळ ठरवून, निश्चय करण्याचा संकल्प केला होता.

आता आपण केलेल्या वाचनाचा तपशील (आपले नाव, गाव, वाचनाचा एकूण वेळ, पुस्तकाचे नाव, लेखक व प्रकाशकाचे नाव, पृष्ठ संख्या व आपले वाचन करतानाचे छायाचित्र इत्यादी) आम्हालाजरूर कळवावा. वाचनविषयक तपशील pustakanchgaav.rmvs@gmail.com या ई-पत्त्यावर पाठवावेत किंवा ९५४५१२६००७ या क्रमांकावर व्हॉट्सअप करावेत, असे आवाहन करण्यात आले आहे.

पुस्तकांच्या गावातील सर्व उपक्रमांत आपला सहभाग असतोच. याही उपक्रमात सहभाग नोंदवून आपण डॉ. अब्दुल कलाम यांचे सार्थ स्मरण करावे आणि वाचन संस्कृतीचे पाईक बनावे, असेही आवाहन करण्यात आले आहे.


संपादन - सुस्मिता वडतिले 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test: शुभमन गिलने जिंकलं 'दिल'! ऐतिहासिक कामगिरी अन् इंग्लंडला न पेलवणारे लक्ष्य; भारताच्या १०००+ धावा

Explainer: फडणवीस आणि शिंदेंची उद्धव ठाकरेंवर टीका; पण राज ठाकरेंसाठी 'मवाळ भूमिका', नेमकं समीकरण काय? वाचा सोप्या शब्दात

IND vs ENG 2nd Test: २६९, १००* ! शुभमन गिलचे शतक अन् ५४ वर्षांपूर्वीचा विक्रम उद्ध्वस्त; एकाही भारतीयाला नव्हता जमला हा पराक्रम

SBI Bank Manager Viral Video : ''तुला iPhone देईन, शारीरिक संबंध ठेव..’’ म्हणत, महिला कर्मचारीशी घृणास्पद कृत्य करणाऱ्या SBI व्यवस्थापकाचा भांडोफोड!

Yavatmal News: लाखो विद्यार्थ्यांचा खडतर प्रवास! शिक्षणासाठी खेड्यातून ‘अप-डाऊन’, सवलतीच्या पासचा दिलासा पण...

SCROLL FOR NEXT