Covishield esakal
सातारा

साताऱ्याला आत्तापर्यंत 72 हजार कोव्हॅक्सिन, तर 6 लाख कोविशिल्ड उपलब्ध

बाळकृष्ण मधाळे

सातारा : सातारा जिल्ह्याला आत्तापर्यंत 72 हजार 890 कोव्हॅक्सिन (Covaxin) व 6 लाख 29 हजार 270 कोविशिल्ड (Covishield) लस उपलब्ध झालेली आहे. इथून पुढे उपलब्धतेनुसार पुरवठा करण्यात येईल, तसेच भविष्यात येऊ घातलेल्या कोरोनाच्या (Coronavirus) तिसऱ्या लाटेसंबंधी घ्यावयाची खबरदारी व करावयाच्या उपाययोजनांबाबत दक्ष राहण्याच्या सूचना आरोग्य उपसंचालक डॉ. संजोग कदम (Dr. Sanjog Kadam) यांनी केल्या. (Instructions To The Officers Of Dr. Sanjog Kadam To Take Measures Against Coronavirus Satara News)

सातारा जिल्ह्याला आत्तापर्यंत 72 हजार 890 कोव्हॅक्सिन व 6 लाख 29 हजार 270 कोविशिल्ड लस उपलब्ध झालेली आहे.

सातारा येथे वैद्यकीय अधिकाऱ्यांसोबत झालेल्या बैठकीत ते बोलत होते. या वेळी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण, आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुद्ध आठल्ये, वैद्यकीय अधीक्षक व तालुका वैद्यकीय अधिकारी उपस्थित होते. यावेळी डॉ. कदम म्हणाले, सातारा जिल्ह्यातील डॉक्टरांची 66 पदे, अधिपरिचारीकांची 27 पदे, प्रशासकीय विभागातील लिपिकांची पदे, तसेच तांत्रिक संवर्गातील रिक्त पदे भरलेली आहेत. तसेच इतरही रिक्त संवर्गातील जागा भरल्याने कोरोना रुग्णांची सेवा देणे सोपे झाले आहे.

सध्या रेमडीसिव्हिर इंजेक्शन (Remdesivir Injection) पुरेशा प्रमाणात उपलब्ध आहे. म्युकरमायकोसिसचे (Mucormycosis Patient) रुग्ण काही प्रमाणात वाढत आहेत. त्यासाठी आवश्यक असणारे इंजेक्शन (ॲम्पोटेरेसीन बी) जिल्हा रुगणालयात उपलब्ध आहे. आतापर्यंत जिल्ह्याला 640 इंजेक्शन प्राप्त झाले आहेत. शासनाच्या निर्देशानुसार लसीकरणाची सत्रे आयोजित करण्यात येत असल्याचेही डॉ. कदम यांनी सांगितले.

Instructions To The Officers Of Dr. Sanjog Kadam To Take Measures Against Coronavirus Satara News

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT