सातारा

पोस्ट कर्मचाऱ्यांच्या उर्मट वर्तनाने नागरिक वैतागले!

संतोष चव्हाण

उंब्रज (जि. सातारा) : येथील पोस्ट कार्यालयातील विस्कळित कारभारामुळे येथील नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत असून, येथील कर्मचाऱ्यांच्या उर्मट वर्तनालाही नागरिक वैतागले आहेत. इंटरनेट सेवा बंद असल्याचे कारण देत हे कर्मचारी नागरिकांना हेलपाटे मारण्यास भाग पाडत आहेत. तसेच कर्मचारी वेळेवर येत नसल्याने येथील कारभार रामभरोसे सुरू असल्याची चर्चा नागरिकांत सुरू आहे. 

येथे बॅंक, शाळा, कॉलेज व व्यवसायासाठी येणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात असल्याने पोस्ट कार्यालयामध्ये नेहमी वर्दळ सुरू असते. येथील कार्यालय तीन कर्मचाऱ्यांवर सुरू असून, त्यातील एक कर्मचारी सुटीवर गेलेला असतो. कार्यालयात आर. डी. व पेन्शनरांची खातेसंख्या मोठी आहे. कर्मचारी सुटीवर जात असल्याने आर्थिक व्यवहारांची गैरसोय होत आहे. तसेच येथील कर्मचाऱ्यांकडून समाधानकारक उत्तरे मिळत नाहीत. पेन्शनरांना तासन्‌ तास कार्यालयाच्या पायऱ्यांवर ताटकळत उभे राहावे लागत आहे. शासनाने सर्व व्यवहार ऑनलाइन केले असल्याने येथील कर्मचारी नागरिकांना दोन-दोन तास उभे करून इंटरनेट सेवा बंद असल्याचे कारण देत आहेत. तर येथे नागरिकांची झुंबड पाहायला मिळत असून, कधी इंटरनेट सेवा सुरू होणार याची दिवसभर वाट पाहत बसून राहावे लागत आहे.

कर्मचाऱ्यांच्या कामचुकारपणामुळे नागरिकांना हेलपाटे मारावे लागत आहेत. कर्मचाऱ्यांच्या उदासीनतेचा नाहक त्रास नागरिकांना सहन करावा लागत आहे. त्यातच कार्यालयातील कर्मचारी वेळेवर येत नसल्याने नागरिकांची सकाळी लवकर कार्यालयाबाहेर रांग लागलेली असते. यामुळे व्यापारी, नागरिक, विद्यार्थ्यांची महत्त्वाची कामे खोळंबत आहेत. परंतु, याचे येथील टपाल कार्यालय विभागाला काही सोयरसुतक नसल्याचे चित्र दिसून येत आहे. याबाबत नागरिकांतून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.  

संपादन : बाळकृष्ण मधाळे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मी खिलाडूवृत्ती दाखवली असती! Run Out वर सलमान अली आघाची प्रतिक्रिया; सचिनला बाद केले तेव्हा विसरलेले sportsmanship

FASTag Annual Pass वार्षिक टोल पास झाला महाग, १ एप्रिलपासून नवे दर लागू

Nashik LPG Supply : नाशिककरानो घाबरू नका! जिल्ह्यात पुरेसा गॅस साठा; अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन

Nutritionist Health Tips: तुम्हाला 35 वर्षानंतरही राहायचंय फिट आणि निरोगी? न्यूट्रिशनिस्टच्या ‘या’ टिप्स नक्की फॉलो करा

Iran Israel War मुळे भारतात दारूचा दुष्काळ? उन्हाळ्यात थंड बिअरही मिळणार नाही? उत्पादनावर काय परिणाम होणार

SCROLL FOR NEXT