सातारा

खंडणी प्रकरणात वन विभागातील आणखी दोन कर्मचाऱ्यांचा सहभाग!

सुनील शेडगे

नागठाणे (जि. सातारा) : पिरेवाडी (भैरवगड, ता. सातारा) येथील युवकाला खोट्या गुन्ह्यात अडकवण्याची धमकी देत त्याच्याकडून खंडणी उकळल्याच्या घटनेत आणखी दोघांची नावे पुढे आली आहेत. ते दोघेही वन विभागाचे कर्मचारी आहेत. या दोघांसह अगोदरचे दोघे असे चौघेही फरारी आहेत. 

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, पिरेवाडी येथील ओंकार शिंदे या युवकाकडून वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी खोट्या गुन्ह्यात अडकवण्याची धमकी देत 25 हजार रुपयांची खंडणी उकळली होती. या प्रकरणात वनपाल योगेश गावित व वन संरक्षक महेश सोनवलेसह दोन अनोळखी व्यक्तींचा समावेश होता. 

बोरगावचे सहायक पोलिस निरीक्षक डॉ. सागर वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस पथकाने अन्य दोघांचा तपास केला असता, वन संरक्षक रणजित काकडे व किशोर ढाणे यांची नावे पुढे आली आहेत. त्यामुळे या खंडणी प्रकरणात वन विभागाचेच चार कर्मचारी सहभागी असल्याचे निष्पन्न झाले आहे. हे चौघेही अद्याप फरारी आहेत. गुन्हा दाखल झाल्यापासून वनपाल योगेश गावित, वनसंरक्षक महेश सोनवले, रणजित काकडे व महेश ढाणे हे चौघेही गायब आहेत. पोलिस पथक त्यांचा कसून शोध घेत आहे. 

संपादन : बाळकृष्ण मधाळे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CCMP BHMS Registration : सीसीएमपी-बीएचएमएस नोंदणीला राज्य सरकारचा हिरवा कंदील; आयएमएकडून राज्यव्यापी सेवा बंदची घोषणा

PMC Development : स्वच्छतागृहे दुरुस्तीऐवजी पाडण्यावर नगरसेवकांचा भर; ५५ प्रस्ताव नव्या बांधकामासाठी

Crime News : माहूरवरून परतणाऱ्या नवविवाहितांवर थरारक हल्ला; नववधूसह दोन लाखांची रोकड लंपास

Karad News : मतदारयादी सखोल पुनरिक्षणात कऱ्हाड दक्षिणची बाजी; पुणे विभागात प्रथम

पेट्रोल-डिझेल आणखी महागणार? केंद्र सरकारने विंडफॉल कराच्या दरात केली मोठी वाढ

SCROLL FOR NEXT