सातारा

जिल्हाधिकारी शेखर सिंह यांची बहीण सातारा ग्रामीणच्या उपअधीक्षक

उमेश बांबरे

सातारा : गृहविभागाच्या आदेशानुसार सातारा जिल्हा पोलिस दलात कार्यरत असणाऱ्या दोन पोलिस उपअधीक्षकांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. दोघांची बदली करतानाच सातारा पोलिस दलात चार नवीन अधिकारी दाखल होत आहेत. यामध्ये आंचल दलाल यांचा समावेश असून, त्या जिल्हाधिकारी शेखर सिंह यांच्या भगिनी आहेत.
 
गेल्या काही दिवसांपासून पोलिस दलातील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे सत्र सुरू आहे. गृहविभागाच्या आदेशानुसार पहिल्या टप्प्यात पोलिस अधीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या. वरिष्ठ स्तरावरील बदल्या झाल्यानंतर अतिरिक्‍त पोलिस अधीक्षक आणि उपअधीक्षक यांच्या बदल्यांची प्रक्रिया सुरू झाली होती. या प्रक्रियेनुसार सातारा जिल्हा पोलिस दलात असणाऱ्या कऱ्हाडचे उपअधीक्षक सूरज गुरव यांची तसेच वाईचे उपअधीक्षक अजित टिके यांची बदली झाली. त्यांची बदली करत असताना रिक्‍त उपअधीक्षकांच्या जागी गृहविभागाने नव्याने नेमणुका जाहीर केल्या.

..अखेर शिपाई झाला मुख्याधिकारी; निवृत्तीचा दिवस ठरला अविस्मरणीय! 

यानुसार कोरेगाव उपविभागाचा कार्यभार गणेश रामचंद्र किंद्रे यांच्याकडे, तर वाई उपविभागाचा कार्यभार शीतल जाणवे-खराडे यांच्याकडे सोपवला आहे. दहिवडी उपविभागाचा कार्यभार नीलेश देशमुख यांच्याकडे, तर सातारा ग्रामीण विभागाचा कार्यभार आंचल दलाल यांच्याकडे सोपविण्यात आला. किंद्रे हे औरंगाबाद दहशतवादविरोधी पथकात, जाणवे या तुरची पोलिस प्रशिक्षण केंद्र येथे, तर दलाल या पुणे ग्रामीण प्रशिक्षण केंद्रात कार्यरत होत्या. दलाल या जिल्हाधिकारी शेखर सिंह यांच्या भगिनी आहेत.

आली रे आली.. कऱ्हाड नंतर नागपूरच्या गुंडांची बारी आली!

तीन-चार फुलांच्या गटांमध्ये आढळते ब्रम्हकमळ : खोकला, सर्दी, कॅन्सरवर आहे गुणकारी

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Surendra Koli : निठारी प्रकरणात निर्दोष मुक्त सुरेंद्र कोलीने जीवन संपवले; २१ वर्षांच्या तुरुंगवासानंतर पुन्हा सुरू केले होते सामान्य आयुष्य

६ वर्षांपासून क्लार्क, पण टायपिंग टेस्टमध्ये तीनदा फेल; जिल्हाधिकाऱ्यांनी डिमोशन करत शिपाई बनवलं

Pune Bus Blaze: शिवाजीनगर चौकात पीएमपी बसला अचानक आग; अग्निशामक जवानाच्या सतर्कतेने प्रवाशांचे प्राण वाचले

Pune Illegal PG Hostels : लोहगावमध्ये ११ बेकायदेशीर पीजी हॉस्टेल सील; विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात घालणाऱ्या जागामालकांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश

Gambling Raid : गंगापूरमध्ये रम्मी जुगार अड्ड्यावर धाड; १.९२ लाखांचा मुद्देमाल जप्त, तिघांसह चौघांवर गुन्हा

SCROLL FOR NEXT