सातारा

दिवाळीपूर्वी उर्वरित एफआरपी देणार; ‘कृष्णा’च्या सभेत निर्णय

- अमोल जाधव

कोविडच्या पार्श्वभूमीवर कारखान्याच्या कार्यस्थळी वार्षिक सर्वसाधारण सभा ऑनलाइन पद्धतीने घेण्यात आली.

रेठरे बुद्रुक (सातारा) : सन २०२०-२१ च्या गळीत हंगामासाठी कारखान्याची एफआरपी प्रतिटन तीन हजार आठ रुपये आहे. त्यापैकी आजअखेर प्रतिटन दोन हजार ८०० रुपये दिले असून, सभासदांच्या मागणीनुसार एफआरपीची उर्वरित रक्कम दिवाळीपूर्वी देण्याची ग्वाही कारखान्याचे अध्यक्ष डॉ. सुरेश भोसले यांनी दिली. सभासदांच्या उसाचे गाळप वेळेत व्हावे, यासाठी कारखान्याची प्रतिदिन गाळप क्षमता १२ हजार मेट्रिक टन करण्याचा निर्णयही सभेत घेण्यात आला.

कोविडच्या पार्श्वभूमीवर कारखान्याच्या कार्यस्थळी वार्षिक सर्वसाधारण सभा ऑनलाइन पद्धतीने घेण्यात आली. त्यावेळी ते बोलत होते. कृष्णा बँकेचे अध्यक्ष अतुल भोसले, कारखान्याचे उपाध्यक्ष जगदीश जगताप, संचालक लिंबाजी पाटील, दयानंद पाटील, जितेंद्र पाटील, धोंडिराम जाधव, गुणवंतराव पाटील, निवासराव थोरात, संजय पाटील, बाबासाहेब शिंदे, बाजीराव निकम, संभाजीराव पाटील, शिवाजी पाटील, दत्तात्रय देसाई, जयवंत मोरे, विलास भंडारे, जयश्री पाटील, इंदुमती जाखले, वसंतराव शिंदे, अविनाश खरात, श्रीरंग देसाई, दीपक पाटील, कार्यकारी संचालक सूर्यकांत दळवी उपस्थित होते.

डॉ. भोसले म्हणाले, ‘‘कारखान्याच्या कार्यक्षेत्रात उसाचे क्षेत्र वाढत आहे. वेळेत गाळप होण्यासाठी कारखान्याचे आधुनिकीकरण करत प्रतिदिन गाळप क्षमता १२ हजार मेट्रिक टन केली जाणार आहे. सध्याच्या डिस्‍टिलरी प्रकल्पाची क्षमता वाढविण्याचा निर्धार संचालक मंडळाने केला आहे.’’ विषयपत्रिकेतील सर्व विषय एकमताने मंजूर करण्यात आले. कारखान्याच्या सध्याच्या भागभांडवलाची दर्शनी किंमत १० हजार रुपयांवरून १५ हजार रुपये करण्याचा ठरावही मंजूर झाला. सभासदांनी विचारलेल्या प्रश्नांची डॉ. भोसले यांनी उत्तरे दिली. श्री. जगताप यांनी स्वागत केले. कार्यकारी संचालक दळवी यांनी नोटीस वाचन केले. सचिव मुकेश पवार यांनी इतिवृत्तांत वाचला. जितेंद्र पाटील यांनी आभार मानले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT