सातारा

भाविकांनाे...श्री क्षेत्र जरंडेश्वरला जाताय, हे जरुर वाचा

राजेंद्र वाघ

कोरेगाव (जि. सातारा) : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशान्वये सातारारोड- पाडळी (ता. कोरेगाव) येथील श्री क्षेत्र जरंडेश्वराची श्रावणी यात्रा रद्द करण्याचा निर्णय श्री जरंडेश्वर देवस्थान ट्रस्ट, ग्रामपंचायत पाडळी स्टेशन, सातारारोड पोलिस दूरक्षेत्र, ग्रामदक्षता समितीच्या बैठकीत झाला. भाविकांनी श्रावणी शनिवारसह श्रावणातील कोणत्याही दिवशी जरंडेश्वराच्या दर्शनासाठी येऊ नये, असे आवाहन करण्यात आले आहे. नियमांचे उल्लंघन करून कोणी आल्यास दंडात्मक कारवाई व वाहने जप्त केली जातील, असा इशारा पोलिस प्रशासनाने दिला आहे.
बायकोसाठी नवऱ्याने दिली बारावीची परीक्षा अन्
 
श्री जरंडेश्वर देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष तानाजीराव फाळके, सहायक पोलिस निरीक्षक संतोष साळुंखे, ग्रामदक्षता समितीचे अध्यक्ष, गावकामगार तलाठी प्रशांत पवार, ग्रामविकास अधिकारी डी. एल. सुरवसे, समितीचे सदस्य सुरेशबापू फाळके, विनोद फाळके, ऍड. पद्माकर पवार, काका पवार, जरंडेश्वर पंचपदी मंडळाचे हणमंत फाळके, सचिन खिरे आदींच्या उपस्थितीत सातारारोड येथे ही बैठक झाली. 

पाच दशकांपासून 'हा' सुवासिक तांदूळ पिकताेय महाराष्ट्रातील 'या' गावात

जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार व प्रशासनाच्या आवाहनानुसार मार्च महिन्यापासून जरंडेश्वर मंदिराचे दरवाजे दर्शनासाठी बंद ठेवले आहेत. मंदिराच्या चारही बाजूंनी मंदिराकडे जाता येऊ नये म्हणून जरंडेश्वर देवस्थान ट्रस्टने उपाययोजना केल्या आहेत, तरीही लॉकडाउनच्या काळात घरात बसून कंटाळा आलेले काही हवसे, नवसे फिरण्याच्या उद्देशाने जरंडेश्वर डोंगरावर येत असतात. डोंगरावर जाणारे रस्ते पायथ्याशी बंद केले असले, तरी काही जण कोठूनही वाट काढत जरंडेश्वरावर जाण्याचा प्रयत्न करत असल्याचे निदर्शनास येत आहे. त्यात बाहेरगावाहून येणाऱ्यांचा मोठ्या प्रमाणात समावेश असल्याच्या मुद्‌द्‌यावर या बैठकीत चर्चा झाली.

आमदार राेहित पवार यांच्या एंट्रीनंतर आणखी काेणा काेणाला मिळाली संधी, वाचा सविस्तर

काॅंग्रेस आमदार गटात कही खुशी, कही गम सारखी स्थिती झाली आहे  

लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या जरंडेश्वर परिसरात, तसेच सातारारोड- पाडळी येथे आजपर्यंत कोरोनाचा स्पर्श झाला नाही. दरम्यान, जरंडेश्वर श्रावणी यात्रेनिमित्त जिल्ह्यातील, तसेच परजिल्ह्यातील भाविक दर्शनासाठी येत असतात. मात्र, आता जिल्हाधिकाऱ्यांच्या पुढील आदेशापर्यंत जरंडेश्वराचे दर्शन व धार्मिक कार्यक्रम बंद केल्याची माहिती बैठकीत देण्यात आली. त्याचबरोबर पाडळी, सातारारोड, भीमनगर, वडूथ, बोरखळ, जळगाव, जांब बुद्रुककडून जरंडेश्वरकडे येणाऱ्या सर्व वाटा बंद करण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध दंडात्मक कारवाई करून संबंधितांची वाहने जप्त केली जातील, असा इशाराही या वेळी पोलिसांनी दिला आहे.
संपादन : संजय शिंदे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

India Census 2026 40 Questions List : जनगणनेबाबत केंद्र सरकारचा मोठा निर्णय! अनुसूचित जाती-जमाती अन् विशिष्ट जातींची होणार नोंद; पाहा 40 प्रश्नांत काय?

Raj Thackeray : पुण्यातील खड्डे, वाहतूक कोंडीवरून राज ठाकरे संतापले; म्हणाले- ज्यांना सत्ता दिली त्यांनाच जाब विचारा

Sangli Milk Collection Drop : FDA च्या धाडींमुळे सांगलीतील दुधाचा 'बनावट खेळ' बंद? तब्बल 78 हजार लिटरने दुधाची आवक घटली; पाहा आकडेवारी

Marathi News Live Updates : बीडच्या इमामपूरचंही नाव बदलणार? मंत्री भरत गोगावलेंच्या वक्तव्याने चर्चांना उधाण

Shivsena Express: कोकण प्रवास मोफत करता येणार, गणेशोत्सवासाठी मुंबईतून विशेष ट्रेन सुटणार; कुठून आणि कधी?

SCROLL FOR NEXT