Jawan Ankush makar sakal
सातारा

Accident : युनिटमध्ये रुजू होण्यासाठी जात असताना नागेवाडीमधील जवानाचे अपघातात निधन

नागेवाडी (ता. कोरेगाव) येथील जवान अंकुश संपतराव माकर (वय ३९) यांचे जम्मूला आपल्या युनिटमध्ये रुजू होण्यासाठी जात असताना बुधवारी (ता. पाच) राजस्थानात रेल्वे अपघातात निधन झाले.

सकाळ वृत्तसेवा

नागेवाडी (ता. कोरेगाव) येथील जवान अंकुश संपतराव माकर (वय ३९) यांचे जम्मूला आपल्या युनिटमध्ये रुजू होण्यासाठी जात असताना बुधवारी (ता. पाच) राजस्थानात रेल्वे अपघातात निधन झाले.

कोरेगाव - नागेवाडी (ता. कोरेगाव) येथील जवान अंकुश संपतराव माकर (वय ३९) यांचे जम्मूला आपल्या युनिटमध्ये रुजू होण्यासाठी जात असताना बुधवारी (ता. पाच) राजस्थानात रेल्वे अपघातात निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, आई, मुलगा, मुलगी, दोन भाऊ असा परिवार आहे.

अंकुश माकर हे गेले १९ वर्षे आठ महिने सैन्य दलात सेवा बजावत होते. त्यांच्या सेवानिवृत्तीला केवळ चार महिने बाकी होते. त्यांनी लेह-लडाख, पंजाब, जम्मू काश्मीर, महाराष्ट्रात विविध ठिकाणी उत्कृष्ट देशसेवा केली. नागेवाडी येथे २० दिवसांपूर्वी आपल्या वडिलांचे निधन झाल्याने ते आठ दिवसांच्या सुटीवर येथे आलेले होते. सुटीवरून जम्मूतील कालचुक या सैन्य दलाच्या मुख्यालयात आपल्या युनिटवर हजर होण्यासाठी ते रेल्वेने निघाले असताना त्यांचे अपघाती निधन झाले. त्यांच्या निधनाची माहिती काल नागेवाडीसह भाडळे पंचक्रोशीत विविध गावांमध्ये पोचल्यानंतर गावोगावी अंकुश माकर यांच्या श्रद्धांजलीचे फलक लावण्यात आले.

दरम्यान, उद्या (सोमवारी) सकाळी आठ वाजता नागेवाडी येथे डिस्कळ- वाठार रस्त्यालगत बिग्याचा माळ नावाच्या शिवारात अंकुश माकर यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार केले जाणार असल्याची माहिती भाडळे पंचक्रोशी आजी- माजी सैनिक संघटनेचे अध्यक्ष नीलेश भोसले यांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

8th Pay Commission : आठव्या वेतन आयोगाकडून कर्मचाऱ्यांना मोठी अपेक्षा; 'ही' मागणी पूर्ण झाली तर दीर्घकालीन प्रतीक्षा संपणार

IPS बुशरा बानो कोण? इन्शाल्लाह म्हटल्यानं वाद, तक्रारीनंतर तडकाफडकी बदली

Solapur News : वित्त आयोग निधी वाटपात पालकमंत्र्यांची मनमानी; जिल्हा परिषद सदस्यांनी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याकडे केली तक्रार

IPL 2027 Auction कुठे होणार? मागील काही वर्षांत दुबई, जेद्दाह, अबु धाबी येथे झाला होता लिलाव; यावर्षी...

Marathi News Live Updates : गणपतीपुळे मंदिरात १ जानेवारीपासून ड्रेस कोड लागू

SCROLL FOR NEXT