Jawan Prashant Bhosale died of heart attack esakal
सातारा

Indian Army : साताऱ्यानं गमावला आणखी एक जवान; कर्तव्य बजावताना प्रशांत भोसलेंना मध्यप्रदेशात वीरमरण

शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या जवान प्रशांत यांच्या मनात देशसेवेची आस असल्यामुळं कमी वयात ते सैन्यात भरती झाले.

सकाळ डिजिटल टीम

सैन्य दलाच्या वतीनं उद्या (गुरुवारी) वेळू या गावी त्यांचं पार्थिव आणण्यात येणार आहे.

सातारा : भारतीय लष्कारात (Indian Army) कार्यरत असलेल्या सातारा जिल्ह्यातील कोरेगाव तालुक्यातील वेळू गावचे सुपुत्र जवान प्रशांत भोसले (वय 38) यांना मध्यप्रदेशमधील सागर (Sagar in Madhya Pradesh) इथं कर्तव्य बजावत असताना वीरमरण आलं.

सैन्य दलाच्या वतीनं उद्या (गुरुवारी) वेळू या गावी त्यांचं पार्थिव आणण्यात येणार आहे. त्यानंतर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. साताऱ्यातील वेळू गावचे सुपुत्र असलेल्या प्रशांत मनोहर भोसले (Prashant Bhosale) यांनी आपलं प्राथमिक शिक्षण गावातील जिल्हा परिषद शाळेत पूर्ण केलं. शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या जवान प्रशांत यांच्या मनात देशसेवेची आस असल्यामुळं कमी वयात ते सैन्यात भरती झाले.

दरम्यान, प्रशांत भोसले यांचं मध्यप्रदेशातील सागर इथं कर्तव्य बजावत असताना ह्रदय विकाराच्या धक्क्यानं निधन झालं. प्रशांत यांच्या पश्चात आई, भाऊ, पत्नी, वहिनी, एक मुलगा, एक मुलगी, पुतण्या, पुतणी असा परिवार आहे. जवानाच्या निधनामुळं गावावर शोककळा पसरली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पुण्यात इमारतीचा स्लॅब कोसळून दुर्घटना, काही जण अडकल्याची भीती; अग्निशमन दल घटनास्थळी दाखल

Miss Universe 2025 : ज्युरीचं स्पर्धक मॉडेलशी अफेअर, जजने फायनलच्या ३ दिवस आधी दिला राजीनामा; सगळं आधीच ठरल्याचा आरोप

Nagpur Leopard Rescue : इंजेक्शन मारलं अन् जाळीत पकडलं; भरवस्तीत शिरलेला बिबट्या जेरबंद, रेस्क्यू ऑपरेशनचा थरारक घटनाक्रम

RTO Scam:'आरटीओच्या जाहिरातीतून फसवणुकीचा नवा फंडा; १९९९ रुपयात वाहन न चालवताच परवाना देण्याचे अमिष, काय आहे वास्तव..

Latest Marathi Breaking News Live Update : "कल्याण-डोंबिवलीत महापौर भाजपचाच"- नरेंद्र पवार

SCROLL FOR NEXT