सातारा

यशवंतरावांनी जो नि:स्वार्थी मार्ग स्वीकारला, त्याच मार्गावर मी वाटचाल करेन : आसगावकर

हेमंत पवार

कऱ्हाड (जि. सातारा) : यशवंतराव चव्हाण यांनी जो मार्ग दाखवला, त्याच मार्गावरून पुढे वाटचाल करेन. महाविकास आघाडीतून मिळालेल्या विजयामुळे शिक्षकांचे प्रश्न सोडवण्याची संधी मिळाली आहे, असे प्रतिपादन नवनिर्वाचित शिक्षक आमदार प्रा. जयंत आसगावकर यांनी केले. 

ज्येष्ठ नेते यशवंतराव चव्हाण यांच्या समाधिस्थळी अभिवादन करण्यासाठी आमदार आसगावर येथे आले होते. त्यादरम्यान ते बोलत होते. युवक कॉंग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष शिवराज मोरे, इंद्रजित चव्हाण, नगरसेवक इंद्रजित गुजर, आप्पा माने, राजेंद्र यादव, जिल्हा परिषद सदस्य निवासराव थोरात, झाकीर पठाण यांच्यासह कॉंग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते. आमदार आसगावकर म्हणाले,"" यशवंतराव चव्हाण यांनी जो नि:स्वार्थी मार्ग स्वीकारला, त्याच मार्गावर मी वाटचाल करेन. त्यांचा वारसा पुढे नेण्याची भूमिका विधानसभेत सहा वर्षे मी घेईन. महाविकास आघाडीतील वरिष्ठांमुळे आई-वडील शिक्षक असणाऱ्या घरातील मुलाला शिक्षकांचे प्रश्न सोडविण्यासाठी संधी मिळाली आहे. त्या संधीचे सोने करेन.'' 

संपादन : बाळकृष्ण मधाळे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs PAK: पाकिस्तानविरुद्ध स्मृती मंधानाच्या नजरेत ‘या’ वर्ल्ड रेकॉर्डवर; आशिया कपमध्ये पुन्हा इतिहास रचणार?

बनावट ST प्रमाणपत्रावर ३० वर्षे नोकरी, तरीही मिळणार पेन्शन; सुप्रीम कोर्टाचा मुंबईतील इंजिनिअरला दिलासा

DJ Noise Health Risks : डीजे ठरतोय सायलेंट किलर मानसिक आरोग्यासह कान, हृदयावर होतो आघात

Geomagnetic Survey In Sangli : तेल, वायू की मौल्यवान धातू? पश्चिम महाराष्ट्रात भूगर्भाचे रहस्य उलगडणार! हैदराबादच्या संस्थेकडून सांगलीसह 'या' 5 जिल्ह्यांत सर्वेक्षण सुरू

Money Habits: पैसा कमावणं सगळ्यांनाच जमतं, पण श्रीमंत लोक करतात 'ही' 5 कामं; तुम्ही करता का?

SCROLL FOR NEXT